B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवरील हंदवाडा येथे भारतीय सैनिक आणि दहशदवाद्यां मध्ये झालेल्या चकमकीत नांदगावच्या मंगेश शिंदे हे सैनिक जखमी झाले आहे,या चकमकीत भारतीय सैनिक दलाचे पाच जवान शहीद झाले होते.
जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगीमुल्ला येथे काही नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार असल्याची गुप्तचरांकडुन मिळालेल्या माहिती नुसार त्यावर भारतीय लष्कराच्या २१ राष्ट्रीय रायफल्स युनिट व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवून सत्यता पडताळून केलेल्या कार्यवाहीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले, मात्र या दरम्यान दोन लष्कर अधिकारी व दोन जवान तर एक पोलीस अधिकारी शहीद झाले.
तर काही जवान जखमी झाले.त्यात शहराच्या भोसलेवाडा येथील व २१ राष्ट्रीय रायफल युनिट मध्ये लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या मंगेश नामदेव शिंदे यांचा समावेश आहे.
दहशतवादी घुसलेल्या भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे अधिकारी गेले असता सदर धुमश्चक्री उडाली होती.सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीमध्ये लान्स नायक श्री.शिंदे यांच्या उजव्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले आहे. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
सन २०१३ मध्ये जनरल ड्युटी म्हणून सैन्यात भरती झालेल्या मंगेश शिंदे यांनी चांगली कामगिरी करत बढती प्राप्त केली होती.व नुकतेच २१ राष्ट्रीय रायफल युनिट मध्ये लान्स नायक पदावर आहे.अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील नामदेव शिंदे यांचे ते पुत्र आहेत.त्यांचे मोठे बंधू मयूर शिंदे हे भारतीय लष्करात राज्यस्थान येथे लान्स नायक पदावर कार्यरत आहेत.