धार्मिक यात्रा रद्द करून पैसै मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

0
BNN
बाबासाहेब दांडगे 




टाकळी-लव्हाळी- 
देशा सह राज्य भरात गेल्या एक महीन्यापासून कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. 

महाराष्ट्रात रूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. देशभरातून  पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दानशुर लोक आपआपल्या परीने मदत करत आहेत. 

मदतीचाच एक भाग म्हणून कन्नड तालुक्यातील  टाकळी- लव्हाळी येथील ग्रामस्थांनी दरवर्षी भरणारी टाकळेश्वर महादेव मंदीराची यात्राच रद्द करून होणारे व विविध मंदीराचे 28 हजार रुपये  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मंगळवारी (दि. 28) रोजी पाठवले आहे. 


यामध्ये जुनी टाकळी येथील हनुमान जयंती च्या अन्नदानाचे 15000/_ ,टाकळेश्वर महादेव मंदीर- 8030/- ,मुस्लिम समाजाने - 700/- ,महानुभाव चक्रधर स्वामी मंदीर  - 400/- व ग्रामस्थांनी 4081/-  असे 28 हजार रुपये कन्नड येथील बॅक आॅफ महाराष्ट्र च्या कन्नड शाखेत  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रक्कम पाठवली आहे. 

टाकळी-लव्हाळी गावचा स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top