डॉ. रोहन बोरसे या कोरोणा योध्याचे नांदगाव येथे जल्लोषात स्वागत

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. रोहन बोरसे यांनी मालेगाव येथील जिवन रुग्णालयात मागील काही दिवस कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करून पुन्हा नांदगाव येथे ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले. 

असता, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि नांदगाव नगरवासीयांच्या वतीने औक्षण करुन, पुष्पवृष्टी करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत करुन नागरी सत्कार करण्यात आला.

 यावेळी सोशल डिष्टन पाळण्यात आले होते.
यावेळी नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. सचिन साळवे यांनी मनोगत व्यक्त करतांना कोरोना या आजाराचे नाव घेतले की मनात भीती निर्माण होते.


 मात्र महाराष्ट्रात जिथे कोरोना कक्ष होईल आणि मला जिथे सांगाल तिथे मी जाण्यास तयार आहे असे स्वतः होऊन सांगणारे डॉ. बोरसे हे नांदगाव तालुक्यासाठी देव माणूसच आहे

तालुक्यातील अनेक रुग्णांना मरणाच्या दारातून वापस आनणाऱ्या जनतेसाठी डॉ. बोरसे हे देवमानुसच  आहे. 

योगायोगाने  त्यांच्या व प्रशासनाच्या नियोजनामुळे नांदगाव शहरात अजून तरी कोरोनाचा शिरकाव झाला नाही ही नांदगावकरांसाठी जमेची बाजू आहे. 


त्यांना मालेगाव येथे कोरोनाचे युद्ध लढण्यासाठी संधी मिळाल्यानंतर त्यांनी निसंकोच पणे संधी स्वीकारून काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मालेगाव येथे रुजू  झाले होते. 


व आज पुन्हा आपली सेवा बजावून आज त्यांचे नांदगाव येथे आगमन होताच रुग्णालयातील सहकाऱ्यांनी व त्याचप्रमाणे नांदगावकरांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले 


नांदगाव तालुक्यात अनेक रुग्णांना मरणाच्या दारातून वापस आनले आहे असे म्हणाले. याप्रसंगी रुग्णालयातील कर्मचारी व नांदगाव येथील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top