महेंद्र कुमावत
(संपादकीय)
डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी बोलायचे 2020 वर्षां मध्ये भारत महासत्ता प्राप्त करेल.डॉक्टर अब्दुल कलाम हे सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्त्व होते.ते बोलत असताना कोणत्या ना कोणत्या आधारावरच बोलत असतील.
म्हणून त्यांनी आपल्या देशाचे भविष्य पाहून आपण 2020 वर्षात महासत्ता प्राप्त करू असे म्हटले असावे. आपण 21व्या शतकात असताना भारताला जगासोबत बरोबरी साधण्यासाठी संगणक व आधुनिकतेची जोड धरणे आवश्यक आहे.
आता आपण पाहतोच आहे सर्वीकडे कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे.सर्व जगाला एकाच ठिकाणी थांबून ठेवले आहे.सर्वीकडे लॉक डाऊन आहे.
तरी कोरानाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडत आहे.म्हणून इतर देशाप्रमाणे भारतात,महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात शाळा महाविद्यालय,शासकीय कार्यालय येथे कर्मचारी कपात करून तर काही ठिकाणी कार्यालय शाळा पूर्ण बंद करण्यात आले आहे.
आपल्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाईन अभ्यास दिला जातो आहे.परंतु या ऑनलाईन अभ्यासाचा विद्यार्थ्यांचा भविष्याचा योग्य विचार आपल्याला करावा लागणार आहे.
ऑनलाइन शिक्षण समस्या
1)विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ लागले तर शिक्षकांचे महत्त्व त्यांच्या दृष्टीने कमी होईल. 2)विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर योग्य प्रकारे विश्वास राहणार नाही,
3)विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करावे हा प्रश्न शिक्षकांना पडेल,
4)विद्यार्थी व शिक्षकांणमध्ये तफावत मोठ्या प्रमाणावर वाढेल,
5)विद्यार्थ्यांचा मानसिकतेवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल
कारण विद्यार्थी शाळेत शिक्षणाबरोबर मैदानावर विविध प्रकारे सामुहिक रित्या वैयक्तिक रित्या खेळ खेळत असतो.
6)जर विद्यार्थी घरात राहिला तर त्याचे शारीरिक स्वास्थ्य देखील बिघडू शकते.
7)ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थी सतत ऑनलाईन राहून विविध गैर प्रकार करू शकतो. *उदारणार्थ*: गेम डाऊनलोड करणे,नको ते पिक्चर डाऊनलोड करणे,सोशल मीडिया द्वारे इतरांना त्रास होईल असे मेसेज पाठवणे,
8)अति मोबाईल वापरल्या मुळे डोळ्यांची समस्या निर्माण होऊ शकते,
9)एकटेपणा मोठ्या प्रमाणात वाढेल,
10)नेतृत्व गुण विकसित होणार नाही,
11)सामाजिक परिस्थितीविषयी आकलन होणार नाही
12)शाळेत नियमित परिपाठ होतो त्या मुळे विद्यार्थ्यांवर विविध संस्कार पडत असतात ते पडणार नाहीत.
13) महापुरुषांच्या कार्यक्रम द्वारे विविध इतिहास समजत असतो तो समजनार नाही.अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतील
*परंतु यावर आपण थोड्या प्रमाणात उपाय सुचवू शकतो*
1)पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात करावा,2)पालकांनी मुलांकडे योग्य प्रमाणात लक्ष द्यावे,
3)आपल्या मुलांना काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा,
4)मुलांना घरी एक वेळ द्यावा, 5)विद्यार्थ्यांचे रोजचे कार्याचे योग्य नियोजन करून द्यावे, 6)विद्यार्थ्यांचा योगा आणि व्यायाम चांगल्या पद्धतीने करून घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांची मानसिकता चांगल्याप्रकारे राहील,
7)मुलांना शैक्षणिक अडचणी असतील तर संबंधित शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची शैक्षणिक अडचण सोडून घ्यावी.
8)मुलांना त्यांचा मित्राशी सोशल मीडिया द्वारे हितगूज करू देने, 9)मुलांचा अंगी कला गुण असतील तर त्याला सहकार्य होईल असे कृत्ये करावी,
10) कुटुंबातील लोकांसोबत योग्य प्रकारे संवाद साधावा,असे विविध उपाय आपल्याला सुचवता येतील.
*शेवटी एकच म्हणावे लागेल ऑनलाइन शिक्षण हे पर्याय ठरू शकते पण उपाय नाही*
*महेंद्र लखीचंद कुमावत (सहाय्यक प्राथमिक शिक्षक) साने गुरुजी प्राथमिक शाळा चाळीसगांव