आरेफ पटेल
बिंदास न्यूज नेटवर्क
सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला विशेष पोलिस अधिकार्यांची निवड करण्यात आली असुन यात खुलताबाद पोलिस ठाण्याअंर्तगत पंचविस जणांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या बारा तेरा दिवसापासुन हे तरुण पोलिसांनसोबत कर्तव्य बजावत आहे.
संध्या सुरु असलेल्या लाॅकडाउन त्यातच कर्मचार्यांची संख्या व ठाण्याअंर्तगत असलेले क्षेञ लक्षात घेता पोलिस अधिकारी कर्मचार्यांना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
त्यामुळे पोलिस विभागातर्फे विशेष पोलिस अधिकारी संकल्पना राबविण्यात येत आहे. यात तरुणांची निवड करण्यात आली असुन त्यांना आता पोलिस दलासोबत बंदोबस्ताला पाचारण करण्यात आले आहे.विशेष पोलिस अधिकार्याचे कर्तव्य व अधिकाराबाबत माहीती देत त्यांना ओळपञ देण्यात आले आहे,
त्याचबरोबर मास्क व सॅनिटायझरही देण्यात आले आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाला मोठी मदत होत आहे.
खुलताबाद तालुक्यात गेल्या बारा तेरा दिवसापासुन पोलिस निरीक्षक सिताराम मेहेञे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पंचविस तरुण विशेष पोलिस अधिकारी म्हणुन पोलिसांच्या मदतीला तालुक्यात विविध ठिकाणी गस्त घालणे, चेक पाॅईंन्ट, फळ मार्केट आदी ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. त्यांना पोलिस कर्मचारी श्री. शिंदे, श्री.भावसिंग जारवाल, निलकंठ ढिवरे, यतिन कुलकर्णी, रामनाथ भुसारे, रविंद्र साबळे आदी मार्गदर्शन करत आहे.