B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक,
साहब आपने हमे सायकल नही प्लेन दिया है हमारे लिए तो आप देवता है, आपका ये उपकार हम जिंदगीभर नही भुलेंगे...
मध्यप्रदेश कडे थेट पायी निघालेल्या परप्रांतीयांना नाशिक रोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे व त्यांच्या विद्यार्थ्यांकडून सायकली मिळाल्यानंतर त्यांनी या भावना व्यक्त केल्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
लॉक डाऊन मुळे अनेक परप्रांतीय बिह्मडासह पाई शेकडो किलोमीटरचा प्रवास करत गावी निघाले आहेत, नाशिक रोडचे समाजसेवक वाघमारे सायकलवर जात असताना त्यांना नाशिक-पुणे महामार्गावर पायी चालत असलेले सहा तरुण दिसले वाघमारे यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली.
त्यावर त्यांनी सांगितले की मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुणे जवळील चाकण येथून पायी चालत येत आहोत. तेथे आम्ही मजुरी करत होतो.
परंतु लॉक डाऊनलोड डाऊनलोड उद्योग व्यवसाय बंद झाले असुन बाराशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघालो आहे. पुण्यातच आरोग्य तपासणी करून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले
, वाघमारे यांनी त्यांना मदत करण्याच्यादृष्टीने पैसे दिल्यावर त्या तरुणांनी कृपा करून बस अथवा ट्रकमध्ये बसून देण्याची विनंती केली मात्र ते शक्य नसल्याने या तरुणांची सायकलवर नजर गेली.
''साहब सायकल मिल गई तो हम कम से कम जिंदा तो घरतक जायेंगे' असे त्या तरुणा पैकी एकाने वाघमारे यांना सांगितले. त्यावर वाघमारे यांनी एका सायकल विक्रेत्या मित्राला फोन करून वरील परिस्थिती सांगितली, त्यावर सदर सायकल विक्रेत्याने वाघमारे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून या तरुणांना दर्जेदार चांगल्या सायकली मोफत दिल्या.
फ्रांसिस यांनी रुपेश बिह्माडे व चार मित्रांच्या मदतीने या तरुणांना जेऊ घातले, खर्चासाठी पैसेही दिले, सायकली मुळे आज ते तरुण मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोहोचल्याचे त्या तरुणांनी फ्रांसिस यांना मोबाईलवर फोन करून कळवले आहे .
''साहब हम मेहनत करके आपके पैसे वापस करेंगे, आपके बँक खाते का डिटेल भेज देना'' असे मध्यप्रदेशातील तरुणांनी फोन करून फ्रांसिस त्यांना सांगितल्यावर फ्रान्सिस यांनी पैसे घेण्यास नकार दिला .
संकट काळातील माणसांना आयुष्यभर मदत करा तीच माझ्या मदतीची परतफेड ठरेल असे उत्तर या तरुणांना दिले.
यावर त्या तरुणांनी आभार व्यक्त करत आपण मध्यप्रदेश मध्ये कोठेही आले तर आवश्य कळवा आणि आपली सेवा करण्याचा मोका द्या असे सांगितले.