पंचवीस परप्रांतियांना घेऊन जाणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनावर शिऊर पोलिसांची कारवाई

0

वैजापूर तालुक्यातील तलवाडा सिलिंग चेक पोस्टावरुन 25 परप्रांतिय प्रवासी अवैध रित्या कोंबून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहानास पाठलाग करून शिऊर पोलीसठाण्याचे सपोनि सत्यजित ताईतवाले    यांनी वाहानावर  कारवाई केली आहे.

    सविस्तर माहिती अशी की,दि. 30 गुरुवार. रोजी रात्री आठ वाजेच्या  सुमारास चेक पोस्ट येथे कर्तव्यावर असताना एक बोलेरो पिकप यास चेक करण्यासाठी थांबण्याचा इशारा केला असतांना ती चेक पोस्ट सोडून नांदगावच्या दिशेने भरधाव वेगाने गेली.

म्हणून संशय आल्याने  तात्काळ पोलीसांनी आपल्या गाडीने  खाजगी गाडीचा  पाठलाग करू लागल्याचे लक्षात आल्याने संबंधित वाहनचालकांने वाहन भरधाव वेगाने चालवल्याने चेक पोस्टापासून 15 किं.मी.अंतर पार केले परंतु  वेळ लागत असल्याने तो थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि म्हणून लगेच नांदगाव पोलिसांना कळून कासारी येथे नाकाबंदी लावण्याची सांगितले. 

तो पर्यंत त्याने कासारी गाव सोडून तो भरधाव वेगाने पुढे चालत होता . पोलिस त्याचा पाठलाग करत होते.

 पण तो गाडीला पास होऊ देत नव्हता त्यात गाडीत नक्की काय आहे ते पण समजत नव्हते त्यामुळे गाडी पण आडवी लावता येत नव्हती प्रवासी जर असेल तर अपघात झाल्यास त्याचा बळी जाऊ नये म्हणून शिऊर पोलीस काळजी घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. 

रस्त्याने बऱ्याच गाड्यांना त्याने कोर्टमध्ये धक्का मारला व जखमी पण झाले त्याचा राग म्हणून बऱ्याच गाड्या त्याचा पाठलाग करत होते .त्यामुळे भरपूर लोक पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे होते. लोकांचा रोष बघून पोलीस त्यांना गाडीतून माहितीद्वारे समजून सांगत होते की गाडीच्या समोर कोणी जाऊ नये .

बाजूला घेण्याचे आव्हान लोकांना करत होते.    त्याच्या गाडीचा वेग भरत असल्यामुळे पोलिसांनी त्याला पास करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती .तसेच गाडीतून कंट्रोल ला कॉल देऊन सदर घटनेची माहिती दिली पुढे तो चाळीसगाव च्या दिशेने रवाना झाला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस होतीच  लगेच चाळीसगाव पोस्टावर ही माहिती कळविली परंतु नस्तनपुर येथे पुलाचे काम चालू होते

 .तेथे कोणताही विचार न करता त्या चालकाने गाडी भरधाव वेगाने पुलावरून रॉंग साईडने घेऊन जीव धोक्यात टाकून तो पळू लागला नंतर पुढे नसतनपुर रेल्वे गेट बंद होते. 


समोर कोणताही मार्ग नसल्याने त्याने गाडी तेथील साईट च्या पुलावर धडक देऊन गाडी थांबवली . पाठीमागे असल्याने  गाडीतून  उतरून लगेच चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला पण अंधार व रोडचे काम चालू असल्याने तो त्याचा फायदा घेऊन लगेच पसार होऊ लागला परंतु शिऊर पोलिसांनी  त्याचा पाठलाग करून शेतात तीन किलोमीटर अंतरावर धावा चालू केला . 

तेव्हा काही कर्मचारीगाडीजवळ थांबलेले होते .तेव्हा गाडीला हिरव्या रंगाचे कापड पाठीमागून लावलेले होते ते काढून बघितले त्यात पंचवीस ते तीस पुरुष महिला व मुले असे एमपीचे मजूर असल्याचे समजले नंतर त्या ठिकाणी खूप गर्दी जमली लोकांचा रोष असल्याने लोक त्यांना मारणार आहे. 

याचा आम्हाला अंदाज आल्याने आम्ही लगेच त्याला गाडीतून बसून तात्काळ निघणार तोच लोकांनी गाडी अडवली पण  लोकांची समजूत काढून त्या ठिकाणी चालकाला सरकारी गाडीत बसून व ते प्रवासी बोलेरो पिकप ताब्यात घेऊन शिऊर कडे रवाना झाले व नंतर त्यांच्याकडून सर्व माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की आम्ही पेंडेफळ ता वैजापुर ते किशोर जगधने यांच्याकडे कामाला होतो .

असे सांगितले पोलिसांनी सदर मजुरांना मालकाच्या घरी शेतात  सोडून गाडी चालक व मालक यांना ताब्यात घेऊन सदर गाडी शिऊर पोलीस ठाण्यात जमा करून   त्यांच्यावर कलम 269, 270 ,188 भा द विे सह कलम 37 (1)(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 2,3,4 साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 नियम 11 महाराष्ट्र कोव्हीड -19 उपायोजना 2020 सह कलम 51(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005प्रमाणे पो. स्टे. ला गुन्हा दाखल केला आहे. 

          सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण मोक्षदा पाटील मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि सत्यजीत ताईतवाले, पो. उप. नि.नागटिळक, पोना/रविंद्र काळे, पो.शि./ अमोल कांबळे, पो. शि.  रावते, चालक पो. शि./ व एस.पी. ओ.  मंगेश जाधव, ज्ञानेश्वर कदम यांनी केली .  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top