B.N.N
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
भारतीय जैन संघटना नेमीनाथ जैन संस्था व फ़ोर्स मोटर यांच्या सयुंक्त विद्यमाने नांदगाव तालुक्यातील सामान्य रुग्णाच्या आरोग्य सेवे करीता मोबाईल डिस्पेन्सरी वॅन फिरता दवाखाना मोफत औषध केंद्रचा शुभारंभ छाजेड़ पेट्रोलियम येथे आमदार सुहासआण्णा कांदे, नगराध्यक्ष राजेश कवड़े यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी तहसिलदार योगेश जमदाडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचके, गटविकास अधिकारी गणेश चौधरी. आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.* प्रास्तविक जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दत्तराज छाजेड़ यांनी केले.
याप्रसंगी फिरता दवाखाना चे संचालक डॉ नितिन जैन सहाय्यक डॉ दीपक ठाकरे आणि साहेबराव गांगुर्ड व प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधि यांच्यावर या संकटसमयी रक्षण करीत असल्या बद्दल उपस्थिताच्या वतीने पुष्प वर्षाव करन्यात आला या प्रसंगी तहसीलदार योगेश जमदाडे मुख्याधिकारी डॉ श्रेया देवचके नेमिनाथ संस्थेचे विश्वस्त महावीर पारख डॉ. नितिन जैन आदिची समयोचित भाषणे झाली,
अध्यक्षीय भाषणात आमदार सुहास कांदे यानी जैन संघटनेच्या कार्याचा गौरव करून उपक्रमास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वशीत केले या प्रसंगी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार यांनी दूरध्वनी द्वारे उपक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्राने सौ. आशा दर्डा यांनी केली तर मंगल पाठ रमणलाल लोढ़ा यांनी सादर केला .
या प्रसंगी जैन संघटनेचे शाखा अध्यक्ष डॉ रमणलाल गादीया जेष्ठ सदस्य सुगंधचद सेठी, वालचंद चोपड़ा ,शामभाऊ पारख सौ सुशील पारख महावीर सुराणा विजय दर्डा संस्कार संस्थेचे राहुल आहेर परेश सिसोदिया जगदीश शेलार ,पंकज देवकाते, बंडू कायस्थ, आदी मान्यवर उपस्थित होते सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत कार्यक्रम यशस्वी झाला व रुग्णांची तपासणी करण्यात सुरुवात करण्यात आली.