B.N.N
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे दि.३१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती कोरना आजाराच्या पार्श्वभुमिवर सामाजिक अंतर ठेवून गुलाब चव्हाण, संजय काळे, धनंजय जानराव यांंचे हस्ते प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून भंडारा अर्पण करून श्रीफळ वाढवून सध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी वाल्मिक वर्पे व संजय काळे यांंचे कडुन गरजवंत नागरिकांना सेनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोणा या महामारी बाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी दिपक काळे, युवराज काळे, आयुब शेख, सचिन गायकवाड, दिलीप सोनवणे, आकाश काळे किशोर आहेर, भीकन काळे, नामदेव रखमा वर्पे सागर गायकवाड हे उपस्थित होते.