धनंजय माने
बीड
- आईसोबत कापूस लावण्यासाठी शेतात गेलेल्या बहिण-भावाच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील मोरवड इथे घडलीय.
विष्णू अंडिल आणि त्याची बहिण पुजा अंडिल असं विज पडून मृत्यू झालेल्या बहिण-भावाचे नावे आहेत.
हे दोघेही सकाळी शेतात कापूस लावण्यासाठी आई सोबत गेले होते.
सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या वादळी पावसात झाडावर वीज कोसळली असता या घटनेत दोघांचा भाजून मृत्यू झाला.