शहरानंतर आता कोरोना ग्रामीण भागात पसरतोय कोरोना
कानडगांंव येथे एक रुग्ण पाॅझीटिव्ह आढळल्याने खळबळ..
संतोष गंगवाल
देवगांव रंगारी
कानडगाव
(ता कन्नड) येथील एक वाहन चालकांचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने देवगाव रंगारी पोलीसांनी शुक्रवारी(ता.१२) सकाळी कानडगांव सिल करण्यात आले असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व डॉक्टरांना होम काॅरंटाईन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी दिली आहे.
कानडगांव येथील वाहनचालक असलेला हा चालक मोसंबी घेऊन दहा दिवसापूर्वी अहमदाबाद (गुजरात) येथे गेला होता. तो गुरुवारी सकाळी दहा वाजता घरी आला असता त्यास श्वासाचा त्रास होत असल्याने दुपारी येथील एका रुग्णालयात तपासले नंतर त्याला घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी कोरोना रिपोर्ट हा पाॅझीटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली.सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी गांवात बंदोबस्त लावण्यात आला असुन त्याचे संपर्कातील दोन लोकांना घाटी रुग्णालय येथे पाठविण्यात आले तर उर्वरित लोकांना गावातील जिल्हा परिषद शाळेत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ गावंडे लक्ष देवुन आहे. ग्रामीण भागात कोरोना आपले हातपाय विस्तारू लागला आहे.
यामुळे आरोग्य विभागापुढे असलेले आव्हान आता अधिक गडद झाले आहे.. ग्रामीण भागातील अनेक गावातून आजही ‘लॉकडाऊन’च्या घोषणेला जनतेकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने जनतेने आता अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे. या वाहनचालकांच्या संपर्कात कोण कोण आले होते याची चौकशी वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. या भागातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहे.
कानडगांव येथे रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ जनार्दन विधाते तहसिलदार संजय वारकड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ संदीप गावीत, गटविकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण वेणीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे आदिनी भेट देऊन योग्य त्या सुचना केल्या.