देवगाव रंगारी हद्दीत दोघांचा मृत्यू.. प्रशासनाने केला परिसर सिल... अंत्यविधीसाठी उपस्थित तेवीस जणांना केले होम काॅरंटाईन...

0

संतोष गंगवाल
बिंदास न्यूज नेटवर्क 
देवगांव रंगारी 
औरंगाबाद

:-देवगाव रंगारी पोलीस हद्दीतील एकाच दिवशी २ कोरोना बाधितांचे मृत्यू झाल्याने हद्दीत चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे.

या बाबत माहिती अशी कि कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील पोलीस ठाणे हद्दीतील पहिली घटना  कानडगाव येथील ४८ वर्षीय इसम हे १० दिवसापूर्वी मोसमी चे भाडे घेऊन अहमदाबादमध्ये गेले होते ते गुरुवारी (ता ११)  वापस आले होते घरी परतल्या नंतर त्यांना श्वास घेण्यात अडचण होती .


या मुळे त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते व त्याचे कोरोना रिपोर्ट काल पॉजिटिव्ह आले होते त्यांच्या वर उपचार चालू असताना काल रात्री ११.३० च्या सुमारास निधन झाले व त्याचे अंत्यसंस्कार औरंगाबाद येथील समशान भूमीत करण्यात आले तर देवगांव रंगारी (ता.कन्नड) येथील  वर्षभरापासून आजारी असलेल्या एका रूग्णाची तब्येत खराब झाल्याने त्यांना गुरूवारी( ता.११) औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात नियमित तपासणी साठी नेले असता उपचारा दरम्यान  शुक्रवारी (ता.१२)रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान त्यांचे निधन झाले . त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी  देवगांव रंगारी येथे करण्यात आल्यानंतर शनिवारी( ता.१३) सदरील मयत व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे जाहिर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


त्या परिसरात आरोग्य पथकासह पोलिसाने प्रशासनाने  यांनी तात्काळ भेट दिली . मयताचा अंत्यविधी देवगांव रंगारी येथेच झाल्याने कुटूंबातील  संपर्कातील पाच जणाचे स्वाॅब घेण्यात येणारं असुन अंत्यविधी साठी उपस्थित  इतर तेवीस जणाना चौकशी करून त्यांना होम क्वाॅरनटाईन करण्याचे आदेश आले आहे 


दरम्यान मयताचा अहवाल शनिवारी कोविड पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे होत तहसिलचे प्रशासकीय अधिकारी , गटविकास अधिकारी डॉ श्रीकृष्ण वेणीकर , तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.बाळकृष्ण लांजेवार ,हतनुर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डाॅ.हेंमत गवांडे ,सहायक पोलिस निरीक्षक संजय आहिरे,बीट जमादार आप्पासाहेब काळे , कारभारी गवळी ,आव्हाळे, जावेद शेख ,मनोज लिंगायत ,श्रीखंडे .तसेच आरोग्य सेविका, सेवक ,आशा.कार्यकर्ती ,अंगणवाडी सेविका  घर परिसरात जावून माहिती घेऊन यांनी परिसर पुर्ण बंद  करण्यात येवुन ग्रामपंचायतीच्या वतीने औषधी जंतुनाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे .तर अती संपर्कातील पाच कुंटूबीयांना स्वाॅब चाचणीसाठी पाठवण्यात येणार असुन अंत्यविधी साठी उपस्थित इतर तेवीस जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


दोन दिवस देवगाव रंगारी बंद..
या दोन्ही घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन रविवार व सोमवारी असे दोन दिवस गांव कडकडीत बंद (अत्यावश्यक सेवा वगळुन)ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.


प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन..
येथे रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे करावे, विनाकारण घराबाहेर पडु नये,मास्कचा वापर करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे , सरपंच कविता सोनवणे, उपसरपंच अनिस कुरैशी व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top