जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील धनगर समाजाच्या वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधावावर कोरोना महामारी मुळे सध्या नैसर्गिक संकट आलेले आहेत त्यात आणखीन भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळांवर चराई बंदी घालण्याचे प्रकार झाले आहे .
त्यामुळे मेंढपाळ बांधवावर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून उठण्याचा प्रकार झाला आहे तरी या संदर्भात माननीय वन अधिकारी साहेबांनी लक्ष घालून पिढीजात शेळी मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना उपजीविकेचे दृष्टीने चराईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी .
मेंढपाळ बांधवावर अशाच प्रकारचा अन्याय होत राहिल्यास शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच वेळप्रसंगी शेळ्या-मेंढ्या मुलाबाळांसह वन अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन तसेच वेळप्रसंगी उपोषण सुद्धा करण्यात येईल येईल तरी सदर निवेदनाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ गीता सोनोने व विदर्भ अध्यक्ष शिव अहिल्या शासन नंदू लवंगे यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे