अरुण हिंगमीरे
जळगाव, नाशिक
राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे व खत पुरवठा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृषी विभाग व कृषी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे ,खत पुरवठा व्हावा हा या संकल्पनेचा मुख्य हेतू असून नांदगाव तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबवला जात असून असाच उपक्रम जळगाव खु येथेही राबवण्यात आला आहे
सविस्तर वृत्त असे की,सोमवार दि .१ जुन रोजी नांदगाव तालुक्यातील जळगाव खु येथे उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदगाव, व रेणुका कृषी सेवा केंद्र नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या अभियानात शेतकऱ्यांना थेट बांधावरच मका बियाणेचे विविध कंपनीचे १५० नग तर कपाशी बियांन्याचे ४७५ ग्रामचे १३० पाकिटाचा पुरवठा करण्यात आला.
यावेळी नांदगाव तालुका कृषी अधिकारी यांनी कपाशी पिकावरील बोड अळी नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत माहिती देतानाच संभाव्य टोळधाड किटाणू यांचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याबाबत खबरदारी व उपायोजना काय कराव्यात याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं टोळधाड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यता डबे, पत्रे, ढोल वाजून टेंबे करून कोरड्या व ओल्या चाऱ्याचा धूर करून टोळधाड नियंत्रण करून आपल्या शेतातून पळून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे जेणेकरून आपल्या पिकाचे संभाव्य नुकसान होणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले यावेळी न्यायडोंगरी मंडळ कृषी अधिकारी संकेत बी कराळे मनमाड चे कृषी पर्यवेक्षक व्ही के नागरे (माऊली ) न्यायडोंगरी मंडळाचे कृषी पर्यवेक्षक ए पी मड, रेणुका कृषी सेवा केंद्राचे संचालक विशाल सोनावणे शेतकरी अर्जुन टिळेकर राजाराम कदम संजय काकळजी शिवाजी टिळेकर भूषण सरोदे,अनिल सरोदे आत्माराम कदम सदाशिव सरोदे संजय सरोदे वाल्मिकी चव्हाण यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते,_
________________________
प्रतिक्रिया
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कृषी केंद्रात बियाणे,खते खरेदी करण्यासाठी जास्त गर्दी होऊ नये यासाठी आम्ही शेतकऱ्यांना गट तयार करून त्याच्या शेताच्या बांधावर बियाणे व खते कशे उपलब्ध करून देता येतील यासाठी तालुकाभर अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रयोग आम्ही राबवत असून त्याला चांगल्या शेतकरी व कृषी केंद्राच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळत आहे,
जगदीश पाटील
तालुका कृषी अधिकारी नांदगाव
शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करत कृषी विभागानेही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जी योजना प्रत्यक्षात उतरली आहे ती खरोखर कौतुकास्पद असून त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रतीचे बियाणे व खत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अर्जुन टिळेकर
शेतकरी जळगाव खु., ता नांदगाव