नाशिक जिल्ह्यात निसर्ग कोपला, वादळामुळे नुकसानी, झाडे उन्मळून पडली

0

B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक


नाशिक जिल्ह्यात शहरासह मालेगाव येथे कोरोणा आजाराने घातलेले थैमान काहीसे कमी होते न होते तोच
जुनच्या पहिल्या तारखेला केरळमध्ये मान्सुनचे आगमन होत, असतांनाच अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नाशिकमध्ये कहर केलेला आहे. दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे, तर मुसळधार पाऊसदेखील बरसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या कच्च्या घरांचे पत्रे उडाले. जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथे एका पोल्ट्रीफार्मचे पत्रे उडाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

निसर्ग वादळाचे परिणाम आज जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसुन आले. सकाळपासुनचे ढगाळ वातावरण कायम होते.  यानंतर दुपारी मुसळधार वृष्टी झाली, तर बर्याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून श्रावन सरी बरसत आहे



सकाळपासुन नाशिक शहर परिसरात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अनेक रस्त्यावर पाणी साठले गेले, तर काही भागात पाऊसामुळे नागरिकांची धावपळ उडाल्याचे दिसुन आले.शहरात पुर्व भाग असलेल्या पंचवटी विभागात पाऊसाने हजेरी लावली. यात आडगांव शिवारात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शहरातील देवळाली कॅम्प व देवळालीगांव, नाशिकरोड भागात पाऊसाने नागरिकांची धावपळ उडवून दिली.

याठिकाणी दिवसभर रिमझीम स्वरुपाचा पाऊस सुरू होता, सायंकाळी साडेचार नंतर मात्र पाऊसाचा वेग वाढल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.

निसर्ग वादळ नाशिकहून जाणार असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी एका व्हिडीओ च्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तर दुपारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतीचेही मोठे नुकसान झालेले बघायला मिळाले.


अंदरसुलला निसर्ग वादळाचा तडाखा बसला. अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील सुमारे ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top