खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धांचा अविरत लढा : तालुका झाला कोरोनामुक्त

0
BNN
बाबासाहेब दांडगे 
खुलताबाद 


"जनतेचा सेवेसाठी आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालयात आपल्यासाठी चोवीस तास हजर आहोत- डॉ.अमोल चव्हाण 



औरंगाबाद जिल्हा रेड झोन झाल्यापासून खुलताबाद तालुक्यात ही कोरोना पसरण्याची भीती अधिक वाढली होती.

 तसेच मुंबई , पुणे, नाशिक आदि जिल्ह्यातून ही लोक खुलताबाद तालुक्यात परतले असुन नागरिक चिंतातुर झाले होते. दुसऱ्या जिल्ह्यातील कोरोनाचे लोण खुलताबादेत येऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन, डॉक्टर्स,पोलिस अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण कोरोनाच्या लढाईत सैनिक झाला होता. 

खऱ्या अर्थाने धनुष्य उचलले ते आरोग्य विभागाने, कोरोनाच्या लढाईमध्ये त्यांच्या सतर्कतामुळे खुलताबाद तालुका निर्धास्त राहिला. आरोग्य विभागने ताक फुकुन घेतले म्हणूनच खुलताबाद कोरोना पासून दूर राहिला.

पलीकडे मुंबई येथून पायी चालत आलेला एक ३२ वर्षीय तरुण बरा झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये खुलताबाद तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तथापि, करोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या खुलताबाद शहरात ग्रामीण रुग्णालयातील योद्ध्यांचा अविरत लढा सुरूच आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन मुंबई येथून पायी चालत आलेला एक पॉझिटिव्ह रुग्ण खुलताबादेत आढळून ३१ मे रोजी २८ दिवस पूर्ण झाले. या कालावधीत व्यक्तीगत समस्या बाजूला सारत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व


वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेसाठी अक्षरशः झटत आहेत. कोरोना विरूद्धचे युद्ध अद्याप संपले नसून, या लढ्यात पूर्ण शक्तीने डॉक्टर वर्ग आपले कर्तव्य बजावत आहेत.दरम्यान खुलताबादकरांनी दाखविलेले धैर्य, प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या खडतर मेहनतीमुळेच खुलताबाद शहर कोरोनामुक्त होऊ शकले. मात्र, अजूनही खुलताबादकरांपुढे अनेक आव्हाने आहेत. स्थलांतरित झालेले चाकरमाने मुंबई, पुणे, औरंगाबाद व राज्याच्या विविध भागांतून तालुक्‍यात येत आहेत. या सर्वांना 14 दिवस "क्वारंटाईन' करणे आवश्‍यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला
संचारबंदी आणि त्यानंतरच्या लॉक
डाऊनच्या काळात गेली दोन महिने उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, नगर अध्यक्ष एस.एम.क़मर  नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे यांच्यासह महसूल, पोलिस, आरोग्य, नगरपरिषद कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. त्यातील आरोग्य विभागांतर्गत खुलताबाद ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉ. अमोल चव्हाण हे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ कार्यरत असून कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी तत्पर आहेत. दोन महिने खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आलेल्या करोना विशेष
कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल
चव्हाण हे सेवा देत आहेत. 
दोन महिने आलेले अनुभव सांगितले, डॉ.अमोल चव्हाण म्हणाले, जेव्हा भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर आरोग्य विभागाने करोना विषयाची रचना, त्याचे संसर्ग लक्षणे, उपाय योजना व शारीरिक स्वच्छता, सुरक्षित वावर इत्यादी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड १९ पथक तैनात करण्यात आले. तसेच तालुक्यातील वेरूळ हे पर्यटन क्षेत्र असुन येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ. बलराज पांडवे यांनी व येथील कर्मचाऱ्यांनी देखील आपला कर्तव्य बजावला.
विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयात फिवर क्लीनिक सुरू करण्यात आले. सर्दी, खोकला, इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वेळीच उपचार करून अलगीकरणात ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. करोना हा आजार नवीन असल्याकारणाने त्याविषयी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेतले. याविषयी परिपूर्ण प्रशिक्षण घेण्यासाठी वेळ देखील देखील न मिळाल्याने त्यातच पीपीई किट, एन ९५ मास्क, सॅनिटायझर या सामुग्रीचा तुटवडा
होता. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाविरुद्धची लढाई सुरूच ठेवली. सुरुवातीला आरोग्य विभागातील सहकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच गैरसमजही भरपूर होते. उपचाराची दिशा ठरत नव्हती. त्यातच
जगामध्ये मृत्यूचे तांडव बघून भीतीने आई- वडिलांनी वैद्यकीय अधिकारी पदाचा तात्काळ राजीनामा द्यायचे सांगितले. आई- वडिलांच्या मागणीप्रमाणे मी राजीनामा न
देता कर्तव्य बजावत आरोग्यसेवा करण्याचा ठाम निश्चय केला. खुलताबाद येथील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ देणार नाही, असा निश्चय करत कोरोना मुक्त खुलताबाद हेच ध्येय उराशी बाळगून डॉ. चव्हाण यांनी करोना विरुद्धची लढाई सुरू ठेवली.

ग्रामीण रुग्णालयतील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपला सहभागिता दर्शवली.यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या मुख्यालयी चोवीस तास तत्पर राहून जनतेच्या सेवेसाठी हजर आहे.यांच्या मेहनतीमुळेच आज खुलताबाद शहर कोरोना मुक्त होऊ शकले.मात्र नागरिकांनी सोशल डिस्टेंसींगचे नियम पाळुन, स्वछता ठेवा , मास्कचा वापर करा, अशा  शासनाचे नियम पाळुन शासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top