राहूल पाटिल
BNN
हतनूर
औरंगाबाद
औरंगाबादहून कन्नड कडे जाणाऱ्या महावितरणच्या लाईनमनचा हतनूर शिवारात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. एकनाथ पाडूरंग जायभाये (वय ३० ) रा. डोणगाव ता. अंबड असे लाईनमनचे नाव असून तो धुळे येथे नोकरीस होता.
शनीवारी ( ता.१३ जून) दुपारी साडेबारा वाजता दुचाकीवरून ( क्रं. एमएच २१बीएल ३६३२ )औगाबादहून कन्नडकडे जात असताना हतनूर शिवारात जोशी वस्तीजवळ कन्नड कडून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने जागेवर मृत्यू झाला होता.
त्यास हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, डॉ. प्रज्योती गायकवाड यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास बीट जमादार सतीश खोसरे, रामेश्वर जाधव करत आहे.