खुलताबाद शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

0
BNN
बाबासाहेब दांडगे 
खुलताबाद 



शहरातील साळीवाडा परिसर पूर्णपणे प्रतिबंधित.

खुलताबाद -
खुलताबाद शहरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील साळीवाडा या भागात राहणाऱ्या एका  68 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 7 जून रोजी प्रकृति खालव्याने तिच्यावर औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या कुटुंबातील सात जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे


.याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून साळीवाडा परिसर प्रशासनाने सील केला आहे. या भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदर कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून सर्व दुकाने व दैनंदिन व्यवहार सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
खुलताबाद शहरातील साळीवाडा जुने स्टेट बैंक रोड परिसरात कोरोनाबाधित महिलेला काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. या महिलेचे स्वैब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

आज मात्र या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल कोविड 19 पॉझिटिव्ह आला आहे.  साळीवाडा भागातील रहिवासी महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, तहसीलदार राहुल गायकवाड, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, न.प. मुख्याधिकारी ज्योती भगत पाटिल, पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी साळीवाडा परिसरात तातडीने भेट देऊन नागरिकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून संरक्षण करण्यातकर्ता मार्गदर्शन केले. 

या वेळेस खुलताबाद नगर परिषदेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, स्वछता निरीक्षक अंकुश भराड व सुरेश वाघ यांनी हा परिसर पूर्णपणे सील केला असुन पोलिस बीट जमादार यतिन कुलकर्णी यांनी साळीवाडा परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य म्हणजे खुलताबाद शहराला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनने अनेक प्रयत्न केले होते मात्र आज एकाचा अवहाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top