कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शनी अमावस्ये निमित्ताने होणारा यात्र्योत्सव रद्द

0


अरुण हिंगमीरे
बिंदास मिडीया
नांदगाव

 शनिदेवाच्या साडेतीन शक्ती पिठांपैकी एक संपूर्ण शक्ती पिठ असलेल्या नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे शनी अमावस्या निमित्त यंदा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यात्रोत्सव साजरा न करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे .


या निर्णयानुसार शनीवार दि.२० जुन रोजी भाविकांसाठी मंदिर खुले राहणार नसुन भाविकांनी कृपया या निर्णयानुसार मंदिर परीसरात सदर समयी कोणतीही गर्दी न करता संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्थानचे जन.सेक्रेटरी ॲड.अनिल आहेर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

 शासनाच्या अध्यादेशा नुसार कोरोणा आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील सर्वच धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आलेली असून, त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत शनीदेवाचे मंदिर देखील बंद असणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.


खांदेश.मराठवाडा.नाशिक.जिल्हासह राज्यातील लाखो भाविक नस्तनपुरला भेट देऊन शनैश्वराचे दर्शन घेत असतात दि.२० जुन रोजी शनीवारी यात्रोत्सव होणार नसल्याने प्रवेशद्वारा जवळच वाहतूक प्रतिबंधित करुन मंदिर परिसरात भाविकांना प्रवेशास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात्रोत्सवा निम्मित्त होणारे  परंपरेत कोणताही खंड पडू नये म्हणुन सकाळी ८ वा. दुपारी १२ वाजता मंदिर बंद ठेउन कोरोनामुक्ती साठी  महाआरती व अभिषेक पुजा होईल तसेच सायंकाळी ६ वाजताही आरती इत्यादी धार्मिक विधी करुण संस्थानच्या वतीने शनैश्वर महाराजांना नैवेद्य अर्पण करण्यात येणार असल्याचे तसेच नेहमी प्रमाणे सजावट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top