माजी आमदारांचा जन्मदिवस वृक्ष लागवड करुन साजरा

0



अरुण हिंगमीरे
नस्तनपुर ,नाशिक

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे 
 माजी आमदार लोकनेते श्री क्षेत्र नस्तनपुर संस्थानचे जन.सेक्रेटरी ॲड.अनिल गंगाधर आहेर यांचा ६२ वा वाढदिवस अभिनव पध्दतीने समाजाभिमुख संकल्प जाहिर करुन साजरा करण्यात आला. 


 आहेर यांच्या ६२ व्या वाढदिवसा निमीत्ताने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता नेहमी प्रमाणे कोणताही अभिष्टचिंतनाचा सोहळा न ठेवता अत्यंत साधेपणाने व अभिनव कल्पनेने साजरा केला. या निमित्त श्री क्षेत्र नस्तनपुर संस्थान व अनिलदादा आहेर मित्र मंडळाने श्री क्षेत्र नस्तनपुरच्या मालकीच्या नव्याने खरेदी केलेल्या १२ एकर जागेत वृक्षारोपण करुण ॲड.अनिलदादा आहेर यांच्या संकल्पनेनुसार ध्यास हरीत नस्तनपुर टप्पा क्र .२ या उपक्रमांतर्गत परधडी ते नस्तनपुर          रस्त्यावरील जागेत  परिसराच्या विकास कामांचा शुभांरंभ करण्यात आला या वेळी विकास कामाच्या फलकाचे  अनावरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थानचे जन.सेक्रेटरी ॲड.अनिलदादा आहेर यांचा प्रातिनिधिक स्वरुपात श्री क्षेत्र नस्तनपुर संस्थानचे वतीने विश्वस्त खासेराव सुर्वे, विजय चोपडा व  उदय पवार यांनी दादांचा सन्मान करुण त्यांचे अभिष्टचिंतन केले.


  यावेळी संस्थानच्या नवीन १२ एकर जागेच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा होऊन या जागेचा टप्पा क्र.२ अन्वये लवकरात लवकर सर्वांगीण विकास घडवुन आणण्याचा निर्धारही करण्यात आला, सदर विकास कामाचे शुभारंभ सोबतच दादाच्या वाढदिवसा निमित्त दर्शन आहेर मित्र मंडळ व अनिलदादा आहेर मित्र मंडळाच्या वतीने अर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॉथी या औषधाचे व मास्क चे मोफत वितरण ही करण्यात आले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व धोका कमी करण्याच्या दृष्टीने व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.


 यावेळेस जेष्ठ पत्रकार जगन पाटील डॉ.प्रविण निकम राजेद्र पाटील डॉ.राजेंद्र आहेर डॉ. शरद आहेर डॉ. विष्णू आहेर ,दर्शन आहेर, सुनिल पवार, महेश आहेर ,भास्कर सोळसे, प्रसाद आहेर, विराज वखारकर, भुषण आहेर, फिरोज मन्सुरी , रावसाहेब शेलार ,पुंजाराम शिंदे, भिलाजी बाचकर ,शिवाजी बच्छाव ,शिवाजी सरोदे ,अनिल सरोदे ,रविकांत शेवाळे ,संदीप मवाळ ,नवनाथ बोरसे, योगेश वाघ, निखील वाघ, कैलास गायकवाड, , डॉ.अरुण पवार, पुंडलीक सदगीर, भागवत वाबळे, वामन चौधरी, पंकज पवार, भुषण खैरणार ,व शनीमंदिर संस्थानचे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.


सदर प्रसंगी कोणताही अभिष्टचिंतन सोहळा आयोजित न करण्यात आल्याने अनिलदादा आहेर मित्र मंडळाच्या विनंतीनुसार अनेकांनी दादांना फेसबुक,व्हाट्सअप,दूरध्वनी द्वारे शुभेच्छा प्रदान केल्यात.यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री.छगनराव भुजबळ साहेब ,महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांनीही दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top