जातेगाव ग्रामपंचायत प्रशासक पदासाठी तरुणांसह जेष्ठ नागरिक देखील रेस मध्ये

0


अरुण हिंगमीरे
जातेगाव,नाशिक. 

जातेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान सरपंच जयश्री लाठे यांचे दिर व दिवंगत सरपंच सुप्रिया लाठे यांचे पती राजेंद्र लाठे, माजी. सरपंच व विद्यमान ग्रा प सदस्य अशोक जाधव यांच्या भावजयी पुजा जाधव, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड या तरुणांसह धनगर समाजाचे जेष्ठ नागरिक दुध डेअरीचे माजी चेअरमन तसेच व माजी सरपंच कल्पना वर्पे यांचे पती शिवाजी वर्पे हे प्रामुख्याने रेस मध्ये असल्याचे दिसून येत आहे. 
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक रद्द करण्यात आल्याने प्रशासक नियूक्त करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्यानंतर ग्रामपंचायतचे पदाधिकारी वगळता अन्य व्यक्तीस प्रशासक म्हणून नियूक्त करावे या बाबतीत मे. महामहिम राज्यपालांनी आदेश काढल्यानंतर ज्याठिकाणची मुदत संपली आहे अशा प्रत्येक गावात बैठका सुरु होवून

आपापल्या पक्ष श्रेष्ठींंकडे लॉबिंग सुरु झाले. व आपण प्रशासक पदासाठी कसेे योग्य आहोत याबाबत मांंडणी सुरु झाली.
त्यातच प्रशासक हा शासकीय अधिकारी असवा, किंवा ज्या ठिकाणी शासकीय अधिकारी उपलब्ध करणे काही कारणास्तव शक्य नाही अशा ठिकाणी पर्याय म्हणून इतरांना नियूक्ती केली तर त्याबाबत योग्य कारणांंसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे असा मे. हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर काही दिवसांपूर्वी निर्णय झाला असल्याने प्रशासक पदावर आपली वर्णी कशी लागेल, यासाठी खलबते सुरु झालेले दिसून येत आहेत.
यासाठी तरुणांसह वयोवृद्ध देखील मागे नाहीत.

यात प्रामुख्याने दावेदार असलेले राजेंद्र लाठे हे स्वतः दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले होते. तर त्यांच्या पत्नी कै. सुप्रिया लाठे व विद्यमान सरपंच भावजयी जयश्री लाठे यांचे मार्गदर्शक होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. मागील पाच वर्षाच्या कार्यकालावधीत त्यांनी गावातील विकास कामांचा अनुशेष बर्यापैकी भरून काढला आहे.

तर दुसरे दावेदार असलेले अशोक जाधव हे विद्यमान ग्रा. प. सदस्य असून माजी सरपंच सुप्रिया लाठे यांचे अकाली निधनानंतर ते सहा महिने येथील सरपंच होते. 
जाधव यांनी देखील त्यांना मिळालेल्या अल्प कालावधित
गावच्या विकासासाठी बर्यापैकी योगदान दिले आहे.

तर तीसरे दावेदार असलेले विठ्ठल गायकवाड हे सुशिक्षित असून सामाजिक कार्यकर्ते आहे व स्वतः शिक्षक आहेत, ते नेहमीच गावातील धार्मीक कार्य असोत किंंवा गावच्या विकास कामांचा प्रश्न असो, ते नेहमी हिरहिळीने भाग घेऊन यापूर्वी आर्थिक योगदान देखील दिलेले आहे. दीवस असो की रात्र, गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहानुभूती पुर्वक सहभागी होतात त्यामुळे तरुणांचे गायकवाड यांच्या नावाला प्राधान्य असल्याचे सांगितले जाते.

तर चौथे प्रशासक पदासाठीचे दावेदार शिवाजी वर्पे हे धनगर समाजातील जेष्ठ नागरिक असून ते स्वतः दुध संकलन केंद्राचे चेअरमन होते, तर त्यांच्या पत्नी कल्पना वर्पे ह्या एक पंचवार्षिक ग्रा. प. सदस्य असतांना आणि एक पंचवार्षिक सरपंच असतांना त्यांचे मार्गदर्शक होते. तसेच त्यांना तालुक्यातील विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती, जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या वेळी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून ते नेहमीच कार्यरत असतात. त्याअनुषंगाने त्यांच्या देखील नावाचा विचार होवू शकतो असे राजकीय जानकार मंडळाचे म्हणने आहे.

वरील चौघेही जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचे यांचे खंदे समर्थक असल्याने या जबाबदारीच्या पदावर सुमारे बारा हजार लोकसंख्या असलेल्या गावच्या  पालकत्वाची जबाबदारी ना. 
भुजबळ कोणाकडे सोपवितात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top