अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
मनुष्य असो की प्राणी, आपल्या वंशातील माता पिता पुत्र पौत्रादींच्या मृत शरीराची अव्हेलना होवू नये, हे सर्वांनाच वाटते.
असाच एक व्हिडिओ नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ कुठला आहे ते माहीत नाही.
परंतु ह्या व्हिडीओ मध्ये दोन तरुणांंना दोन कुत्र्याचे पिले मयत झालेले अढळून आल्या नंतर त्यांची दुर्गंधी पसरु नये यासाठी त्याने रस्त्याच्या कडेला एक खड्डा खोदला, त्यावेळी तेथे त्या दोन्ही पिल्लांची आई दफन करतेवेळी तेथे आली.
आणि तिने जमेल तेवढी माती आपल्या तोंडाने त्या दोन्ही मृत पिल्लांच्या अंगावर एखाद्या माणसाची दफनविधी करतात, तशी माती ढकलू लागली.
हा सर्व प्रकार पाहून आगोदर दुर असलेले नागरिक जवळ येवून भावनिक होवून पाहु लागले. आणि एकच चर्चा सुरू झाली, "मुक्या प्राण्यांना पण भावना असतात"
मयत कुत्र्यांच्या पिल्लाचे दफन करणार्या त्या दोन्ही तरुणांच्या कार्याचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.