ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्या, अडी-अडचणी, शासनादरबारी पोहचविण्यासाठी तसेच समाजात विविध सकारात्मक व विधायक कार्य करण्यासाठी वैजापूर ब्राम्हण महासंघच्या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी संतोषी भालेराव यांची तर
उपाध्यक्ष म्हणून प्रिया लाखे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . या कार्यकारिणीत जया थावरे, प्रतीक्षा भालेकर, अनघा आंबेकर,
रेवती लालसरे, प्रतिभा अघोरकर, भरती सोंदे,अनघा पालकर,प्रतीक्षा जोशी, वैष्णवी जोशी, ज्योती भालेराव, सोनाली पाठक, अपूर्वा भालेराव, शीतल थावरे, सीमा देशपांडे,प्रांजल कुलकर्णी, अंजली ताई जोशी, ज्योती ताई जोशी आदींचा समावेश आहे.
या कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.