जातेगाव जनता विद्यालयाच्या तीन विद्यार्थीनी परिक्षा केंद्रात प्रथम, विद्यालयाचा निकाल ८९.८३%

0

 
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव



  जातेगाव येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या शालांत परीक्षेचा निकाल ८९.८३% लागला असून येथील तीन विद्यार्थ्यांनी न्यायडोंगरी येथील परिक्षा केंद्रात प्रथम येवून बाजी मारली आहे.

 या बाबत सविस्तर वृत्त असे की, विद्यालयाचे ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण ५९ नियमित विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

न्यायडोंगरी परिक्षा केंद्रात असलेल्या एकुण २८३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कु.गिता बाळनाथ पवार हिने (८५.०७%), कु.गिता एकनाथ पवार हिने (८२.१५%), अश्विनी गणेश निकम हिने (७८.९२%), या तीन विद्यार्थीनींंनी सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. व जातेगाव येथील ६५ परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी वरील तिघींसह  कु.स्वाती नानासाहेब चव्हाण हिने (७७.६९), आणि कु. कोमल दिलीप सोनवणे (७६.९२%) यांनी विद्यालयात ६५ परिक्षार्थींंपैकी सर्वात जास्त गुण मिळवून प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.


सर्व यशस्वी विद्यार्थायांचे अभिनंदन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक 
दिलीप पाटील, अध्यक्ष, माध्य.शालेय समिती


अर्जुन पाटील, अध्यक्ष,उच्च माध्यमिक शालेय समिती
जयवंत चव्हाण,  प्राचार्य एस.के. राख, प्राध्यापक आर. ए.वाळूंज, यु.ए.निकम, एस.आर.पाटील, शिक्षीका बि.आर.सोनवणे तसेच माध्यमिक विभागातर्फे सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी  यांनी सर्व शिक्षकांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top