विरशैव संस्थेच्या जिल्हा आणि तालुका प्रमुखांच्या निवडीसह इतर पदाधिकार्यांची निवड संपन्न

0


अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक

महाराष्ट्र विरशैव सभा पुणेच्या या संस्थेच्या नाशिक जिल्हा सभासदांची नुकतीच संस्थेचे माजी प्रदेशाध्यक्ष  वसंतराव नगरकर, माजी कोषाध्यक्ष बद्रीनाथ नाना वाळेकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष जगदीश घोडके कार्याध्यक्ष डॉ. संदेश हिंगमीरे, उपाध्यक्ष अविनाश भुसारे, सरचिटणीस संजय फोलाने जेष्ट कार्यकर्ते नानासाहेब नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे.

 जगदीश लोहारकर, तलिकाताई साखरे, अनिल पठाडे, अतुल गाडे यांची उपाध्यक्ष पदी, शिवमुर्ती खडके, सुधिर सुराडे, भरत खोडदे, संतोष डोमे, रविंद्र अदयप्रभु यांची संघटकपदी, मोहन घोडके यांची खजिनदार पदी, तर परमानंद घोंगाने, राजेश डोबरे यांची सह खजिनदार म्हणून, महेश डबे यांची चिटणीस पदी तर अरविंद तोडकर, दिनेश लोहारकर, दत्तात्रय सोनावणे यांची सहचारिणी पदी निवड करण्यात आली.


याच बैठकीत नाशिक जिल्हा महिला आघाडीची पण निवड करण्यात आली. यावेळी कुंदाताई गोंधळे यांची जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली, तर राजेश डबे यांची युवा आघाडी प्रमुख पदी, बंडूआप्पा निळकंठ यांची वधु-वर सुचक मंडळाच्या अध्यक्ष पदी, अंबादास आंधळकर यांची शिक्षण समिती प्रमुख पदी, तर अरुण हिंगमीरे यांची प्रसिद्धी प्रमुख पदी, बंडुआप्पा गवंडर यांची सोशल मीडिया प्रमुख पदी प्रविण वाळेकर व्यापारी आघाडी प्रमुख,डॉ. प्रकाश कबाडे यांची वैद्यकीय सेवा समितीच्या प्रमुख पदी, अँड. महेश घोंगाने कायदेशीर सल्लागार समितीच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. 
तर याचवेळी जिल्ह्यातील तालुका प्रमुखांची देखिल निवड करण्यात आली, त्यात जितेंद्र हिंगमीरे यांची नाशिक तालुका प्रमुख पदी,अरुण गोंधळे यांची मालेगाव तालुका प्रमुख पदी, नंदकिशोर हिंगमीरे यांची निफाड,  योगेश सुराडे येवला, बाळासाहेब कबाडे यांची चांदवड, सोमनाथ घोंगाने यांची नांदगाव आणि पेठ तालुका प्रमुख पदी आनंद धोंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे प्रांतिक सदस्य धोंडूनाना हिंगमीरे,डॉ. नितीन शाहिर,डॉ. सुनील हिंगमीरे हे उपस्थित होते. जिल्ह्यातील वरील सर्व मान्यवरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top