खबरदार.....! नागपंचमीला जुगार खेळाल तर .. शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि ताईतवाले यांची तंबी

0
 Saurabh Lakhe
Bindass News Network 
 
नागपंचमी निमित्ताने ग्रामीण भागात खुलेआम पत्ते, जुगार खेळण्याची प्रथा आहे या जुगाऱ्याना शिऊरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी खणखणीत इशारा दिला आहे, नागपंचमीच्या दिवशी समूहाने एकत्र येत किंवा जुगार , पत्ते खेळल्यास  कडक कारवाई करण्याचा इशारा स.पो.नि सत्यजित ताईतवाले यांनी दिला आहे. 

शनिवार (दि.२५) रोजी नागपंचमी उत्सव आहे, या दिवशी  ग्रामीण भागात सर्रास जुगार  खेळला जातो तर   पत्त्यांचे डाव देखील रंगतात. आपल्या विविध कारवाईने जिल्ह्यात गाजलेले सपोनि  सत्यजित ताईतवाले यांनी यंदा जो कोणी पत्ते, जुगार खेळताना दिसेल त्याची गय  केली जाणार नाही असा इशारा दिला आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिऊर पोलिसांनी घेतलेला निर्णयाचे स्वागत होत आहे. 
एकीकडे नागपंचमी आहे म्हणून नागदेवतेसह शंकराची आराधना करणाऱ्या महिला तर दुसरीकडे याच दिवसाच्या   मुहूर्तावर बिनदिक्कत जुगार, पत्ते खेळनारे त्यांचे पतीदेव हे चित्र नागपंचमीला ग्रामीण भागात दिसून येते  ग्रामीण भागात  तर जुगाऱ्यांचा अक्षरक्ष: पोळा भरतो  तर या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप येते , पत्त्यांचा डावातुन लाखो रुपयांची उलाढाल होते,  ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याचे लोण अनेक भागात पसरले आहे.  सणासुदीच्या दिवसाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, परंतु शिऊरसह  अनेक   गावात नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याची एक वेगळीच प्रथा असल्याने यामध्ये तरुण पिढी त्यांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे, या गैर प्रकाराला आळा घालण्यासह कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिऊर पोलिसांनी पाऊले उचलली असून शिऊर पोलीस ठाणे हद्दीत या दिवशी पत्ते, जुगार खेळणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि ताईतवाले यांनी सांगितले आहे. 

जुगाऱ्यांना  पर्वणी असलेल्या या  पत्ते पंचमीला बहुतांश गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात, काही ठिकाणी  तर या डावाला जत्रेचे स्वरुप येते, यात एक्का बादशाह, रम्मी, तिरर्ट, असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून जुगार खेळला जातो. दिवस उगवल्यापासून कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होतात.  या पत्तेपंचमीच्या खेळात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो यात कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतो. 

नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते . या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा आहे , यात तरुणासह वृद्धांचाही समावेश असतो मात्र या परंपरेला वेगळे वळण लागत आहे , श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदीयाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या सणाला अन्यन्यसाधारण महत्व आहे तरी काही कुप्रथाही अनेक वर्षांपासून रूढ झाल्या आहे . आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला 'गटारी' म्हणून साजरी केल्यानंतर गावागावातील जुगाऱ्यांना नागपंचमीचे वेध लागतात.  नागपंचमीच्या दिवशी 'पत्ते पंचमी' साजरी करत लाखो रुपयांची उलाढाल करतात. 
*ताईतवाले यांच्या कारवाईची जिल्ह्यात चर्चा* 
शिऊर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सातच महिन्यात सपोनि  सत्यजित ताईतवाले यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून अवैध धंदे चालकांची पळता भुई थोडी केली आहे, अवैद्य पध्दतीने वाळू वाहतूक करणाऱ्या 25 हुन अधिक वाहनांवर कारवाई तर दारू विक्री करणार्यावर 90 गुन्हे दाखल केले आहे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये बंदोबस्तासह जनजागृतीचे काम देखील ते करत असल्याने  त्यांच्या या कार्याची जिल्ह्याभर चर्चा आहे, त्यातच त्यांनी जुगाऱ्याना इशारा दिल्याने पत्ते, जुगार खेळणाऱ्यानी चांगलीच धास्ती घेतली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top