B.N.N
अरुण हिंगमीरे
नाशिक
दिंडोरी पेठचे लाडके आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांचा मुलगा गोकूळ नरहरी झिरवाळ यांच्या लग्नाच्या हळदीची रात्री संभळ वाद्यावर नाचण्याचा ठेका घेतला होता .
तसेच नामदार नरहरी झिरवाळ यांच्या चिरंजिवाचे हे लग्न म्हणजे पेठ तालुक्यातील करंजाळी येथील एकाच घरातील चौथी पिठीचे लग्न झाले .
माझी आजी , आई , पत्नी , व आता सुनबाई अशी चौथी पिढीत आमची एकाच कुटूंबातील नाते जपत असल्याचे नामदार नरहरी झिरवाळ यांनी बोलतांना सांगीतले .
महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी सिताराम झिरवाळ यांचा द्वितीय चिरंजिव गोकूळ झिरवाळ यांचे पेठ तालुक्यातील पद्माकर छबिलदास गवळी यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का.जयमाला हिच्याशी लग्न दिं३० जुन रोजी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले
चिरंजिव गोकूळ झिरवाळ यांच्यावर नाशिक जिल्ह्याचे
ह्या विवाह समारंभाचे संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवरांची उपस्थिती होती.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांनी ही फेसबुकच्या माध्यमातून वधूवरांना आर्शिर्वाद दिलेत.
त्याचप्रमाणे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर या फेसबूक लग्नाला घरातील व्यक्तीच्या मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून विवाह सोहळा संपन्न झाल्याचे फेसबूक लग्नाचे कौतूक केले .
तसेच हळदीच्या दिवशी रात्री नामदार नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील त्यांच्या निवासस्थानी झिरवाळ यांच्यासह धर्मपत्नी सौ.भा चंद्रभागा झिरवाळ यांनी संभळवाद्यावर नाचण्याचा ठेका धरल्याने उपस्थितांनी ओवाळणी टाकून संभळवाद्य
वाजवणार्या कलाकारांना खुश केले .