टिकटॉक बंद झाल्याच समजले आणि दिनेशच्या दोन्ही बायका ढसढसा रडल्या

0
बिंदास न्यूज नेटवर्क
धुळे

आपण स्टार व्हावं, सेलिब्रिटी व्हावं, आपलेही चाहते असावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वप्नं साकार केलं ते टिकटॉकने (tiktok). भारतातील सर्वाधिक पसंतीतंच टिकटॉक अॅप. याने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावलं. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार (tiktok star) झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली. 


मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर मोठं संकट कोसळलं आहे. 

अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील दिनेश पवार (tiktok star dinesh pawar).
धुळ्यात राहणारे दिनेश पवार आपल्या दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे.

 या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचं म्हटलं आहे.


द प्रिंटशी बोलताना दिनेश म्हणाले, आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजलं. माझ्या दोन्ही पत्नींनी ही बातमी पाहिली आणि त्या रडूच लागल्या. आमच्यासारख्या लाखो लोकांना असंच दु:ख झालं असणार. आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे"

दरम्यान दिनेश यांनी टिकटॉक व्हिडीओतून पैसे कमावल्याचं नाकारलं आहे, मात्र आपल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. असं त्यांनी सांगितलं.


गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देशातले अनेक तरुण Tik Tokच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असून ते सेलिब्रिटीही झाले आहेत. 

आता देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या App वर बंदी घातल्याने या स्टार्सचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय

अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top