राजगृहावरील हल्ल्याची सीआयडी कडून चौकशी करावी – दिपक कांबळे

0
Bindass News Network 

मुंबई : नॅशनल सोशालिस्ट पार्टी सलग्न माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती ने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध नोंदवला असुन .श्री .दिपक कांबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे .याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पाठविले आहे.

राजगृह हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. 

मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. 

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. 

राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी . दिपक कांबळे मा अ पत्रकार संरक्षण समिती प्रदेश अध्यक्ष, मा. संदीप हराळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एनएसपी मा .अविनाश मुळीक उपाध्यक्ष एनएसपी, मा. सचिन भुर्के सरचिटणीस, मा. किरण शिंदे मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. दत्ता साकृतकर
यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top