बोलठाण येथे कोरोना बाधित आढल्याने मोठी खळबळ

0
  

अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव

नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यापारपेठ म्हणून ओळख निर्माण झालेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथे एक कोरोणा सदृश्य आजाराची लक्षणे असलेला एक पुरुष रुग्ण अढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.



येथील ग्रामपालीकेचे पदाधिकारी,  कोरोणा उच्चाटन समिती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांनी संयुक्त रित्या मागील चार महिने येथून हाकेच्याअंतरावर असलेल्या औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याची हद्द असतांना अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळून गावात वेळोवेळी नागरिकांना कोरोणा या महामारी पासून दूर राहणे बाबत मार्गदर्शन केले, गावात निर्जंतुकीकरन केले, 

२४ तास नाकाबंदी करून गावात नवीन व्यक्ती महानगरातुन येनार नाही याची विषेश खबरदारी घेतली. वेळोवेळी जनता कर्फ्यु घेऊन कोरोणाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला.  


बोलठाण ही ग्रामीण बाजारपेठ असल्याने व येथे जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक, कृषिउउत्पन्न बाजार समितीचे उपबजार समितीचे आवार, पेट्रोलपंप असल्याने यासह किराणा, कापड, बिल्डिंग मटेरियल कृषी सेवा केंद्र असल्याने तालुक्यातील घाटमाथ्यावरील १६ व शेजारील वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील जवळपास तीस गावातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त येथे यावे लागते.


बाधित व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ससाणे यांनी तातडीने बोलठाण येथे भेट देऊन योग्य त्या सुचना दिल्या यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती गोंड व डॉ. प्रियंका बोरुडे, आरोग्य सहाय्यक देवनाथ साळुंखे, पोलीस हवालदार रमेश पवार, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे सरपंच ज्ञानेश्वर नवले, ग्रामसेवक भगवान जाधव, कोरोणा उच्चाटन समितीचे अध्यक्ष अनिल रिंढे, रफिक पठाण, जितेंद्र पाटणी, अमित नहार उपस्थित होते.  

अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नाशिक

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top