अरुण हिंगमीरे
बिंदास मिडीया
मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी दादर येथील आंबेडकरी जनतेचे उर्जास्थान व प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या "राजगृह" ह्या वास्तूची
अज्ञात जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करुन नुकसान केली आहे.
त्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून सदरील घटना ही निषेधात्म असून ह्या घटनेचा भिमशक्ती संघटने च्या वतीने व अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने भिमशक्तीचे नाशिक जिल्हा नेते मनोज चोपडे यांनी दि.९ जुलै रोजी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करुन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळ करणार्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी बोलतांना चोपडे म्हणाले की, राजगृहावरील हल्ला केलेल्या जातीवादी प्रकृतीच्या लोकांना अटक करून योग्य ते शासन व्हावे अशी मागणी भिमशक्ती संघटना व अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने अशी मागणी करीत आहोत .
अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देत आहोत . यावेळी भिमशक्तीचे नांदगाव शहराध्यक्ष सोनू पेवाल , विद्रोही नेते अशोक जगताप, हेमंत जगताप, सामाजिक कार्यकर्ते दिपक अंभोरे, रोहन गायकवाड अदी उपस्थित होते.