अरुण हिंगमीरे
नाशिक
महाराष्ट्र शासनाने राज्य भर कार्यरत 72 हजार आशा व 3500 गट प्रवर्तक कोरोना योध्या आरोग्य सेवेचे काम करत आहेत. अल्प प्रमाणात मानधन केंद्र सरकार देते आशा ना 2 हजार रुपये व कामाचा मोबदला वेगळा मिळतो तर गट प्रवर्तक ना फक्त प्रवास भत्ता च दिला जातो.
या विरोधात सातत्याने पाठपुरावा आंदोलन केली जात होती. 2019 ला 15 दिवस संप ही केला होता. मात्र दखल घेतली गेली नाही. 3 जुलै 2020 पासून आयटक सह सर्वच 6 आशा संघटना एकत्र येऊन संप ची हाक दिली होती. मात्र महाविकास आघाडी ने आशा ना 2 हजार रुपये व गट प्रवर्तक ना 3 हजार रुपये दरमहा जुलै पासून देण्याची घोषणा केली होती. आज शासन निर्णय काढल्याने आशा व गट प्रवर्तक नि आनंद वेक्त केला आहे. शासनाने सर्व्ह चा मोबदला दररोज चा 300 रु. आशा व गट प्रवर्तक ना द्यावा. व संरक्षण साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घ्यावे.
सर्व्ह साठी गावपातळीवर करण्यात आलेली कोरोना आपत्ती निवारण समितीतील सर्वानी मदत करावी . आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन 21 हजार रुपये दरमहा मिळावे अशी अपेक्षा वेक्त करत आहेत. आशा व गट प्रवर्तक कामाची दखल शासनाने घ्यावी. लढाऊ आशा व गट प्रवर्तक चे अभिनंदन महाराष्ट्र आयटक अद्यक्ष कॉम्रेड सी एन देशमुख यांनी केले आहे.
राज्य भरातील कार्यरत आशा व गट प्रवर्तक संघटना या पुढील काळात एकत्रित संघर्ष करून लढाई करतील.
मिळालेली मानधन वाढ ही सुरुवात आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढत आहे. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारने याची दखल घेऊन आशा व गट प्रवर्तक ना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहू असे प्रतिपादन आयटक आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक सलग्न) चे राज्य सरचिटणीस कॉम्रेड सुमन पुजारी,आध्यक्ष राजु देसले, राष्ट्रीय फेडरेशन उपाद्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी, जिल्हा संघटक विजय दराडे,माया घोलप, अर्चना गडाख,सुवर्णा मेतकर, मनिषा खैरणार, दिपाली कदम, सुनंदा परदेशी,बेबी धात्रक, गितांजली काळे, छाया खैरणार, लता लाठे, ज्योती जाधव, वैशाली बोरगुडे, सुनिता गांगुर्डे, संगिता भोये,वैशाली कवडे, सुषमा वटारे, सुरेखा खैरणार, सुवर्णा जाधव, आदींनी केले आहे.
अरुण हिंगमीरे
नाशिक