Bindass News Network
पुण्यतिथी विशेष
स्ञोत -विकीपीडिया
शब्दांकन प्रविण भाडाईत
नमस्कार बिंदास पुण्यतिथी विशेष मध्ये आपण संतशिरोमणी सावता महाराज यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टि जाणून घेणार आहोत.मिञांनो महापुरूषांना जातीनुसार वाटून घेण्यापेक्षा त्यांचे विचार आपण समाजात वाटले असते तर आज या महापुरूषांचे कर्तव्य सर्व समाजालाच समजले असते.परंतू असो आपण आपल्या पायात चप्पल घातली की पृथ्वीवर चामड पसरविण्याची गरज पडत नाही.नाही का?
सावता माळी (जन्म : इ.स. १२५०; समाधी : इ.स. १२९५) हे एक मराठी संतकवी होते.
अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती.
पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत.
पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय.
दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला.
त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत.
तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे