बेवारस अपघातग्रस्त पेशंट ला शीवुर पोलीसांच्या व माणुसकी समुहाच्या प्रयत्नाने मीळाला नीवारा

0

 By 

 Saurabh Lakhe

 


शिऊर पोलीस ठाणे हद्दीत दि.१७ जुलै रोजी रात्री ११वाजेच्या सुमारास गारज ते बाभूळगाव रोडवरील अपघातात एक अनोळखी बेवारस व्यक्ती आढळून आली होता,त्यामध्ये त्या अपघात खुप जास्त मार लागलेला होता हि बाब पत्रकार दादासाहेब तुपे यांच्या लक्षात आली त्यानी सदरील घटनेबाबतची माहिती साय्यक पोलीस नीरिक्षक सत्यजीत ताईतवाले शीवुर पोलीस स्टेशन यांना दिली घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर त्याला घाटि रुग्णालयात दाखल केले परंतु १० दिवसाचा कडक लाँकडाऊन  होता घाटित नेल्यानंतर पेशंट जवळ कोन थांबनार असा प्रश्न ?सी.एम.ओ यांनी तुपे यांना केला.



त्यानी समाजसेवक सुमित पंडित यांच्या कार्यावीषयी कल्पना होती त्यानी ह्या पेशंट ची माहिती रात्री २ च्या सुमारास अपघात वीभागासमोर मदत कार्यास ऊभे असनारे माणुसकी समुहाचे सुमित पंडित यांना पत्रकार तुपे यांनी दिली. 

सुमित यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले व या व्यक्तीवर आजपर्यंत घाटीत उपचार सुरू होते घाटितील वार्ड क्र ४ मधील डाँक्टरांनी खुप सहकार्य करुन त्याच्यावर योग्य ते ऊपचार दिले. आता ही व्यक्ती पुर्णपणे शारीरिक द्रुष्टीने बरी झाली आहे, परंतु हा सदरची व्यक्ती मतीमंद असल्याचे साँक्रेटिक चे डॉ देशमुख यांनी स्पष्ट केले.



आता घाटि रुग्णालयातुन त्या अनोळखी पेशंट ला सुट्टी झाली आहे.आता त्याला ठेवायचे कुठे असा प्रश्न सुमित यांना पडला होता.यासाठी औरंगाबाद येथील समाजसेवक सुमीत पंडीत यांनी अनेक संस्था व शासकीय नीवाराग्रुह कुठे आहे याचा शोध घेतला परंतु सगळ्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली काहिंनी तर सांगीतले संध्या कोरोना चालु सध्या अँडमेशन बंद आहे 


सर्वोतोपरी प्रयत्ना नंतर आज दि.२८ रोजी संत गाडगे महाराज शि सा क्री मंडळ संस्थाचालवीत असलेल्या  प्रशात गायकवाड यांच्या शहरी बेघर निवाऱ्यात सदर व्यक्ती ची व्यवस्था करण्यात आली आहे. या माणुसकी च्या नात्याने साय्यक पोलीस नीरिक्षक सत्यजीत ताईतवाले,पोलीस.पोलीस जाधव,बकले,ढवळे व पत्रकार दादासाहेब तुपे,घाटितील डॉ अनीता कंडी,समीर तडवी,प्रतीक अग्रवाल,समीर राठोड,दिपीका शेलार,वैदेही,प्रशांत गायकवाड,सुमित पंडित आदिंनी सहकार्य केले.


हे तर माझे कर्तव्य

सदरक्षणाय...हे ब्रीद घेऊन पोलीस आधिकारी म्हणून काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही दातृत्व भावना मनात ठेवून हे आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे माझं कर्तव्यच आहे. खऱ्या अर्थाने आपण करत असलेले काम योग्य असून "माणुसकी" हा शब्द आपल्या कार्यामुळे सफल होतो.आपल्या कार्याला शुभेच्छा आहेतच,आपण जेव्हा सांगाल तेव्हा मी आपल्यासाठी तत्परतेने मदतीसाठी तयार आहे.असेच कार्य करत राहा, निराधारांचा आधार बना, अनाथांचे नाथ बना.



----सत्यजीत ताईतवाले स पो नि शिऊर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top