अरुण हिंगमीरे
जळगाव, नांदगाव
बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका सौ. मंगल कांदे यांना कोव्हीड योद्धा हा पुरस्कार देवून स्वातंत्र्यदिनी गौरवण्यात आले.
सौ. कांदे यांना दिलेल्या सन्मानपत्रात 'आपण कोरोना महामारीच्या काळात सामाजिकतेचे भान ठेवून सेवाभावी वृत्तीच्या कर्तव्याप्रति निष्ठापूर्वक सामाजिक कार्य केले आहे.या कार्याची दखल घेऊन गौरव करत असल्याचे म्हटले आहे.
याबद्दल अंगणवाडी सेविका सौ.मंगल कांदे यांचे आमदार सुहास कांदे,नांदगाव एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी सागर वाघ यांनी अभिनंदन केले आहे.