बिंदास रिपोर्ट
सौरभ लाखे कडून,
शिऊर येथे इतिहासात प्रथमच एक गाव एक गणपतीची स्थापना राजमाता जिजाऊ स्मारकाच्या नियोजित जागी करण्यात आली.
शिऊर ग्रामस्थांच्या तसेच लोकप्रतिनीधींच्या हस्ते विधिवत पूजा होऊन गणरायाची स्थापना करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिऊर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत एक गाव एक गणपती ही संकल्पना सत्यात उतरवली. पोलीस -ग्रामपंचायत प्रशासनासह गावातील लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनाला शिऊर येथील आठही गणेश मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी सहमती दिली. सर्व गणेश मंडळांना एक गाव एक गणपती बाबत विविध कामं विभागून देण्यात आली आहे.
कोरोनाचे थैमान लक्षात घेता मास्क, सॅनिटायझर, व सुरक्षित सामाजिक अंतर राखत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या वेळी सरपंच नितीन चुडीवाल, उपसरपंच जाकीर सैययद, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच चंद्रशेखर खाडगौरे, अशोकराव जाधव, माजी उपसरपंच नंदकिशोर जाधव, ग्रामविकास अधिकारी मधुकर चाबूकस्वार,
तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्करराव जाधव, उपाध्यक्ष चांगदेव जाधव,बाळा जाधव, प्राध्यापक शेखर देशमुख, मंगेश जाधव, यांच्यासह ग्रामस्थ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते