Mh Bindass
Report By-Saurabh Lakhe
शिऊर: परिसरातील शेतात शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी टाकुन निर्दयी अज्ञात आरोपी फरार झाला. मानवतेला कलंक लावणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिऊर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
शिऊर गावाच्या शिवारात राजेंद्र शांताराम पवार यांच्या कपाशीच्या गट नंबर ३०३ शेतात लहान बालकाचा रडण्याचा आवाज आला. सदर शेतकऱ्याने आवाजाच्या दिशेने जाऊन पहिले असता एक लहान बाळ आढळून आले.
सदर शेतकऱ्याने ही घटना पोलीस पाटलाद्वारे पोलीस ठाण्याला कळविण्यात आली..सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी कर्मचाऱ्यांसह त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन बाळ त्याब्यात घेतले.
शिऊर येथील आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून स्थानिक बिट कर्मचारी जाधव.आर.आर यांनी सदर घटनेचा पंचनामा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फरहाना खान यांच्या मदतीने केला. सापडलेले अर्भकाची तपासणी करून ते चार ते पाच तासाचे असल्याचे कळते.
अर्भकास औरंगाबाद येथील घाटीमध्ये पाठवण्यात आले. पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भा द वि ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.जाधव आर.आर,बकले एस.एन हे करीत आहेत.