माहिती संकलन
अरूण हिंगमीरे
अतिरिक्त खाटा व ऑक्सिजनची केली मागणी केली आहे
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्ह्यात अतिरिक्त रुग्ण खाटा व ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाााच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केली संसदेत केली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जलद गतीने वाढत असल्याने दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात शून्य प्रहरात प्रश्न मांडत डॉ. पवार यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे लक्ष वेधले.
नाशिक येथील जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व बेडच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने अनेक रुग्णांना आरोग्य सुविधे अभावी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तर बऱ्याच रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी खाटांची उपलब्धता होत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे
तर अनेकांना उपचारा अभावी जिव गमवावे लागले आहे. केंद्र सरकरमार्फत लवकरात लवकर मध्यवर्ती पथकाकडून नाशिक जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचा योग्य तो आढावा घेण्याची मागणी खासदार डॉक्टर पवार यांनी केली आहे.
त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात जास्तीत जास्त बेडची लवकरात लवकर व्यवस्था करावी व रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा दिली जाऊ शकते, या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. खा. डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील वाढती परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांची स्वतः भेट घेऊन सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली.