माहिती संकलन
सौरभ लाखे
जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बळेगाव ता.वैजापूर जि. औरंगाबाद येथे हरित शाळा अभियान प्रकल्पा अंतर्गत "डेन्स फॉरेस्ट" प्रकल्पाचे उदघाटन मा.श्री.आनंद निकम सर पं.स. सदस्य वैजापूर, श्री रामेश्वर सूर्यवंशी अध्यक्ष शा. व्य. समिती बळेगाव व श्री.काकासाहेब सामृत सर केंद्रप्रमुख श्री.विजय बोडखे पोलीस पाटील
यांच्या शुभहस्ते दि.20/9/2020 रोजी संपन्न झाले. जिल्हा परिषद औरंगाबाद, इकोसत्व एनवोरमेंटल सोल्युशन्स औरंगाबाद, वन विभाग औरंगाबाद , ग्राइंड मास्टर औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम जिल्ह्यातील 100 जिल्हा परिषद शाळांत राबविण्यात येत आहे.
त्या अंतर्गत २००० चौरस फुट जागेत स्थानिक देशी प्रजातींची जास्तीत जास्त आॕक्सिजन देणारी,औषधी तसेच फुले फळे देणारी ६०० झाडे लावण्यात आली.यामध्ये बेल, कडुलिंब,शिरस, मोहावा, आवळा, कदंब,कळंब, शतावरी, शिसम, पिंपळ,आंबा, बेहडा,अर्जुन, बिबा,जांभुळ, हिरडा, खैर, आपटा,पळस, कांचन, तुळस, सिताफळ, उंबर या जातीची झाडे आहेत.या झाडांमुळे अवघ्या तीन वर्षात घन वन तयार होणार आहे.ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण,औषधी वनस्पतींची माहिती ,झाडांच्या प्रजाती यांची माहिती प्रत्यक्ष शाळेतच मिळणार आहे.त्याचबरोबर फुलपाखरे,पक्षी ,किटक यांना आधिवास तयार होणार आहे. इकोसत्वचे एनवोरमेंटल सोल्युशन्स चे प्रकाश बकाल व प्रेम राजपूत व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गिते सर यांनी प्रकल्पाबद्दल माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर ठुबे व प्रविण गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादासाहेब सूर्यवंशी,सुनिल सूर्यवंशी,दत्तू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, सर्व शा. व्य. स. सदस्य, शिक्षक श्री उबाळे सर यांनी प्रयत्न केले.
तसेच या कार्यक्रमासाठी गावातील सर्व पदाधिकारी , नागरीक, फाॕरेस्ट चे कर्मचारी,केंद्रातील शिक्षक ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मराठे यांनी केले.