माहिती संकलन
अरूण हिंगमीरे
By-MH Bindass
त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे दि.१९ सप्टेंबर रोजी दुपारी ०३:४५ वाजेच्या सुमारास शनी मंदिर चौक ग्रामीण रुग्णालय समोर हरसूल या ठिकाणी हरसूल पोलिसांनी दमण केंद्र शासित प्रदेशातून अवैध दारूचे वाहतूक करीत असतांना .गुजरात राज्यातील होंडासिटी कार क्रमांक जि, जे ,१५ सी.जि.८०१७ या गाडीतुुुन विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या विदेशी दारू व बियरची किमंत अंदाजे,५,०००००/-रुपये असल्याचे समजते.
सदर कारवाई बाबद दारूची वाहतूक करणारा आरोपी क्र. १)मयंक हसमुखलाल पटेल वय.२९ वर्ष रा.०५/३८ भरे दिया फलिया ,उमरसाडी .देसाईवड ता.पार्डी ,जि. वलसाड. राज्य गुजरात येथील रहिवासी असून,
दुसरा त्याचा साथीदार नाव ,सोहेल सलीम शिंधी वय ,३० वर्ष रा.चिंचपाडा ,फलिया मोटी वडियाल ,ता.कापराडा जि. वलसाड (गुजरात राज्य)
यांच्या विरुध्द, हरसूल पोलिस ठाणेयेथे गुर नं १०७/ २०२० भा.द.वि कलम२७९, ४२७, मुंबई दारू बंदी कायदा कलम ६५(ई)८३ सद.मो.वा. का.कलम १८४/ १७७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मालेगाव अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावकर, भीमा शंकर ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी पेठ विभाग व स्थानिक गुन्हेशाखेचे सहाय्यक पो.नि.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी.स.पो.नि.विशाल टकले.पो.उ.नि.शिवाजी नागवे.पो.ह.२४१८, झिरवाळ पो.ना.१२२०, निलेश जाधव.पो.ना./११६१, सुनील तुंगार पो.शि.३०४९, संदीप दून बळे पो.शि.२६६६, रतन शिंगाडे. पो.शि.१५३७, उमेश बच्छाव.पो.शि.१५५२, विलास जाधव पो.शि.१३२५, रवी गवळी यांनी केलेली आहे.