माहिती संकलन
अरूण हिंगमिरे
खरीप हंगाम २०२१ मधिल मका व बाजरी खरेदी करण्यासाठी आमदार सुहास (आण्णा) कांदे यांचे प्रयत्नातून फेडरेशन मार्फत आधारभूत किंमतीत मका व बाजरी खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. सध्याचे मका व बाजारीची कवडीमोल भावात विक्री होत असुन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखिल निघत नाही. शासकीय हमीभाव व बाजार भाव यात मोठा फरक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
१ नोव्हेंबर २०२० तर ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत खरीप पणन हंगाम २०२१ मधिल मका व बाजरी हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. नांदगांव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शनैश्वर नांदगांव तालुका खरेदी विक्री संघामार्फत मका व बाजरी खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असुन १ नोव्हेंबर पासुन ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शासकीय धान्य हमी भाव योजनेचा लाभ घेऊन
नांदगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले मका व बाजरी विक्रीसाठी आणून वरील योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार कांदे, शनैश्वर नांदगांव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विलास आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती तेज कवडे, तहसिलदार उदय कुलकर्णी, सहाय्यक निबंधक देवरे आदींनी केले आहे.
आ. कांदे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या धान्य हमी भाव योजनेचे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्वागत केले असून घाटमाथ्यावर असलेल्या बोलठाण येथील उपबाजार समितीच्या आवारात देखील हमी भाव पध्दतीने मका तसेच बाजरी खरेदी केली जावी.
जेने करुन या परिसरातील शेतकरी बांधवांनी येथून सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव येथे धान्य घेऊन जान्याचा खर्च कमी होईल आणि एकच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.