महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांच्या यादीतील एक नाव ,या नावाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख ते शहर म्हणजे वैजापूर आणि याच वैजापूरची शान असलेले हे दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांच्यावर अगदीच चीमुकल्यापासून ते वडिलधाऱ्या मंडळीपर्यंत सर्वच प्रेम करतात. आपल्या कार्यकुशलता आणि जनतेप्रती आस्था बाळगणारे प्रेमळ मनाचे व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेले समाजरत्न डॉ दिनेशभाऊ परदेशी!
डॉ दिनेशभाऊ परदेशी यांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिले.
गेली कित्येक वर्षे विविध सामाजिक उपक्रमातून जनतेची सेवा करण्यासाठी अविरत लढणारा योद्धा अशी त्यांची ख्याती. दैनदिन व्यवहारात ,समाजशील जीवनात शांतता ,नम्रता,लीनता आणि सर्व धर्म सहिष्णुता सर्व गुनानी संपन्न असलेल्या या सावलीला हजारो जन अनाथांची माउली म्हणून संबोधू लागले. सामाजिक जीवनात चोवीस तास जनतेची सेवा आणि फक्त जनतेच्या समस्या हाच मानस डोक्यात ठेऊन घराबाहेर पडायचं आणि दिवसभरात शेकडो बहुजनांची प्रलंबित प्रश्ने मार्गी लावायची. हा त्यांचा दिनक्रमच ! इतकाच नाही तर संध्याकाळी घरी परतताना सुद्धा आजच्या दिवसातील कुण्या गोर गरीब ,दिन दुबळ्याचे एखादे महत्वपूर्ण काम तर माझ्याकडून राहिलेले नाही न असा विचार करून घरात पाऊले ठेवणारे डॉ दिनेशभाऊ परदेशी यांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिले.
तेव्हापासून उदय झाला तो एका नव्या क्रांतीचा .
असंख्य निराधारांनी जेव्हा डॉ दिनेशभाऊ परदेशी
यांच्याकडे आजवर आपल्या समस्या मांडल्या या सर्व समस्यावर तोडगा काढत लहान थोरांसह
मुली महिलांचे बंधुत्व स्वीकारून भाऊ हि उपाधी जनतेने त्यांना कार्य गौरव म्हणून आत्मीयतेने
आणि प्रेमपूर्वक बहाल केली. तेव्हापासून उदय झाला तो एका नव्या क्रांतीचा .
डॉक्टर हि पदवी त्यांनी सर्व क्षेत्रात सिद्ध करून दाखविली.
नगरपरिषदेच्या माध्यमातून वैजापूरचे रुपडे पालटनाऱ्या परदेशी
कुटुंबाने असंख्य असामान्य उपक्रम राबविले आहेत. डॉ हि पदवी खरोखरच त्यांना शोभली.
कारण ज्यांनी जनतेच्या आरोग्यासह प्रशासकीय कामात ख्वाडा घालणाऱ्या मुजोर
अधिकाऱ्यांनाही आपल्या रसायनाने जनतेची सेवा करण्यास भाग पाडले आणि सामाजिक किडीवर
नियंत्रण मिळवले म्हणून डॉक्टर हि पदवी त्यांनी सर्व क्षेत्रात सिद्ध करून
दाखविली.
देव देवतांची मंदिरे असो,कि मस्जिद गुरुद्वारेचा विषय
अध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला तो म्हणजे अगदीच गल्ली बोळातल्या गणेश मंडळांच्या देणगीचा विषय असू द्या कि, जत्रा-यात्रेचा, देव देवतांची मंदिरे असो,कि मस्जिद गुरुद्वारेचा विषय. महापुरुषांच्या जयंतीचा विषय असो कि, समाज मंदिरांचा ! विषय प्रभ श्रीराम जन्मोत्सवाचा असो कि, जगभरात नोंद घेतली जाणाऱ्या सप्ताहाचा असो सर्व समाजाच्या ईश्वराप्रती असलेल्या दृढ भावनेने आर्थिक मदत करून कधी कधी मोठी जबाबदारी स्वीकारून दिनेशभाऊ यांनी स्वतचा सहभाग प्रत्येक धर्माच्या अध्यात्मिक उपक्रमात नोंदविल्याचे दिसून येते.
वर्ल्ड ऑफ गिनीज बुकात नोंद होणाऱ्या सप्ताहाची जबाबदारी
सन २०२३ या वर्षात सर्वात मोठा मानला जाणारा आणि वर्ल्ड ऑफ गिनीज बुकात नोंद होणाऱ्या सप्ताहाची जबाबदारी सर्वाना सोबत घेऊन पार पाडण्यासाठी अथक परिश्रम दिनेशभाऊ यांनी घेतले.राजकीय जोडे हे अध्यात्मापासून कायमच दूर ठेवत आलेल्या या अवलियाला असंख्य जन देव मानतात.
भाऊंची हॉटलाईन झक्कास पने प्रश्न मार्गी लावते
अगदीच राजकीय क्षेत्रात बोलायचे म्हटले तर मतदात्यापासून ते थेट दिल्लीश्वरापर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यापर्यंत भाऊची ओळख ! त्यांच्या या ओळखीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री नेहमी प्रभावित असतात. त्यामुळे जनसामान्यासह कार्यकर्ता जर अडगळीत सापडलाच तर भाऊंची हॉटलाईन झक्कास पाने प्रश्न मार्गी लावते. हे नवलच ! आजवर शेकडो वेळा बघूनहि दिनेशभाऊ हे कधीच उदास आणि निराश दिसले नाही हे विशेष परंतु जनतेची काळजी त्यांना नेहमीच सतावते.
अपघात झाला हि बातमी जेव्हा तालुक्यात पसरली तेव्हा
मध्यंतरीच्या काळात त्यांचा खूप मोठा अपघातही झाला होता,परंतु सर्वसामान्य जनतेचे दिनेशभाऊ यांच्या प्रती असलेले प्रेम आणि सततचा अध्यात्माचा सहवास लाभलेल्या दिनेशभाऊ यांना या अपघातातून ईश्वराने सुखरूप बाहेर काढले. अपघात झाला हि बातमी जेव्हा तालुक्यात पसरली तेव्हा अनेक मंदिरांच्या घंटा वाजण्यास सुरुवात झाली . विविध समाजाच्या प्रार्थनास्थळामध्ये ईश्वराला प्रार्थना केली जात होती,ती म्हणजे देवा आमचेही आयुष्य घे पण आमच्या दिनेशभाऊस आमचही आयुष्य लाभूदे ..!
आरोग्याची,शरीराची काळजी न करता हा झुंजार लढवैय्या पुन्हा जोमाने कामाला लागला
देवाने हि प्रार्थना ऐकली आणि भाऊ पुन्हा सुखरूप यातून बाहेर पडत समाजाच्या सेवेसाठी पुन्हा तळमळीने कार्य करताना दिसू लागले. आपल्या आजार पनावर मात करत डॉ दिनेशभाऊ यांनी खर तर काही दिवसांसाठी विश्रांती घेणे गरजेचे होते,परंतु स्वतच्या आरोग्याची,शरीराची काळजी न करता हा झुंजार लढवैय्या पुन्हा जोमाने कामाला लागला आणि जनसेवेतच ईश्वर सेवेचा आनंद मानणाऱ्या या तेजोमय दिनकरास डॉ दिनेशभाऊ परदेशी यांना टीम बिंदासचा मानाचा मुजरा.
अंतकरणात सुद्धा विरोधाकाबद्दलचे असीमित प्रेम
असंख्य अनुभव,असंख्य सुखद क्षण भाउनी हजारो परिवारात पेरले आहे. आपल्या अंतकरणात सुद्धा विरोधाकाबद्दलचे असीमित प्रेम असलेलेल्या या विभूतीबद्दल कुणाला बर द्वेष वाटेल. समाजसेवेच्या रणांगणात ज्यांनी कधीच जात बघितली नाही, कधी धर्म बघितला नाही उच्च-नीच भेदभाव केला आहे,हा आपला तो परका असा विचारही केला नाही ,सदैव फक्त माणुसकी हाच विषय अंगीकारून सर्वार्थाने समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा असा निश्चय केलेल्या दिनेशभाऊ यांना समाज आता समाजहिरो म्हणायला लागलाय. डॉ दिनेशभाऊ सारखी देवमाणस जोवर आपल्या अवती-भोवती वावरत आहेत ,तोवर कितीही संकटे ,प्रलोभने आलीत तरी धीराने सामोरे जाता येऊ शकते हे मात्र नक्की.
आमच्यासारख्या सामान्य शेतकरी सामान्य नागरिक लोकांच्या कमेंट तुम्ही डिलीट करत जाऊ नका.
ReplyDeleteखरं आहे.... Comment डिलिट करून राहिले हे.
ReplyDeleteपैसे घेऊन बातमी लावतात हे.
ReplyDeleteखऱ्या बातम्या लावत जा.
ReplyDeleteखऱ्या बातम्या लावत जा.
ReplyDeleteदुसऱ्याला साग ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कारड पाषाण. तुम्ही बातम्या देता की पैसे घेऊन जाहिरात करता. अगोदर स्वतः सुधरा जरा आणि खऱ्या बातम्या द्या. समस्त वैजापूर करांची दिशाभूल करू नका. तुमच्या यूट्यूब चैनल पेक्षा जनता फार हुशार आहे. स्वतः दहा ठिकाणी तोंड मारणारे तुम्ही एकतरी पक्षात 5-6 महिने राहिलात का?
ReplyDeleteचार पैसे टाकले की भुंकायला चालु झाले.
आमच्या वैजापूरकरांना तुमच्या सारख्या रंग बदलू बातमी देणाऱ्यान्ची गरज नाही.
तुम्ही बी आर एस पक्ष जॉईन करायच्या अगोदर वेगळ्या पक्षात होता बी आर एस पक्ष सोडल्यानंतर तुम्ही आता भाजप पक्षात जॉईन झालात. आणि लोकसभेच्या निवडणुका अगोदर वेगळ्या पक्षात जाल ही तुमची पक्ष बदलू मानसिकता नागरिकांपासून लपून राहिलेली नाही.
-सामान्य वैजापूरकर