जञेत जसे कंदूरी मटन बनविल्या जात बिलकूल त्याच गुणवत्तेचे कंदूरी मटन या हॉटेलात बनविलं जात.येथे फक्त 220 रुपयांत घरगुती पद्धतीचे नॉनव्हेज मांसाहारी जेवण दिल जात. येथे असलेले काका आणि मावशी स्वत:च्या हाताने हे जेवण तयार करून ग्राहकांना खाऊ घालतात.
छञपति संभाजीनगरपासून अगदिच जवळ असलेल्या धुळे -सोलापूर महामार्गावर पिंपळगांव पांढरी येथे मिळते अस्सल कंदुरी मटण !
ते ही गावराण पद्धतीने !
येथील कंदूरी मटनात वापरण्यात येणारा येसूर,घरगुति मसाला हे तर खासच ! याशिवाय स्वत:च्या शेतात पाळलेला बोकड दररोज सकाळी खाटीक बोलावून बोकड कापतात.
बोकडाचे हे मटन येथे भल्या मोठ्या तांब्याच्या डेगीत मटन शिजवल्या जात,दुपारी बारानंतर येथे कंदूरी जेवणाची मेजवाणी सुरू होते.