जय श्रीरामाच्या जयघोषात न्हाऊन निघाले तलवाडा...!

0

 

देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा.पुरुषोत्तम महाराज यांचे प्रतिपादन....!

शांताराम मगर ,

आयोध्येत रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे प्रवेशद्वार समझल्याजाणार्या वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे टाळ -मृदुगाचा जयघोष, करत सादरीकरण, वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केलेले बालक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जय श्रीराम भजनात तल्लीन झालेल्या महिला पुरुष मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात करण्यात आलेला जयघोष हे सर्व डोळ्याचे पारणे फेडणारे चित्र होते राल्लाची भव्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत आबाल वृद्ध सहभागी झाले होते.हनुमान मंदीररापासून या शोभयात्रेचा प्रारंभ करण्यात आला , दरम्यान तलवाडा येथील ग्रामस्थानी घरोघरी गुढी उभारल्या होत्या.




 

 डोक्यावर कलश तुळशी वृंदावन घेऊन महिलांवर्ग देखील भक्तीनामात तल्लीन झाल्या होत्या तर स्थानिक लोकप्रतिनिधीनीही फुगडीवर ठेका धरला. युवक वर्गाने टाळ म्रुदंगाच्या बोलावर ताल धरत या मिरवणुकीत रंगत आणली.फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

यावेळी बोलतांना पुरुषोत्तम महाराज म्हणाले देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा

 देशाने आपल्यासाठी काय केले हा विचार केल्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार तरुणांनी करावा. अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे. त्या आजपासून देशात रामराज्य स्थापन होईल, असे मत पुरुषोत्तम महाराज यांनी  तलवाडा व्यक्त केले.



गावकऱ्यांना महाप्रसाद म्हणून पुरणपोळी.

माणूस आपल्या गुण आणि कृतीतूनच आपली ओळख निर्माण करतो. प्रभू राम यांना त्यांच्या स्वभाव, गुण आणि कर्तृत्वामुळे मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन एक आदर्श पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम असे केले आहे.कारण प्रभू रामचंद्रांनी सत्य, दया, करुणा, धर्म आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर राज्य केले.प्रभू राम यांनी दया दाखवत सर्वांना आपल्या छत्रछायेत जागा दिली. त्यांच्या सेनतील पशु़ मानव, दानव सर्व प्रकारे होते त्यांनी सर्वांना पुढे वाढण्याची संधी दिली. सुग्रीवला राज्य, हनुमान, जाम्बवंत व नल-नील यांना देखील त्यांना वेळोवेळी नेतृत्व करण्याचा हक्क दिला. त्यांनी प्रत्येक जाती, प्रयत्येक वर्गाच्या मित्रांसह प्रभू रामाने ‍नाते जपले.




 भगवान राम केवळ एक कुशल व्यवस्थापक नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार होते. ते प्रत्येकाला विकासाची संधी देत असून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करत होते. त्यांच्या या गुणांमुळे लंका जाण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सेनेने दगडांचा पूल तयार केला होता.आसे विविध दाखले देत पुरुषोत्तम महाराज यांनी मत व्यक्त केले.

यावेळेस पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होते.यावेळेस सर्व गावकऱ्यांना महाप्रसाद म्हणून पुरणपोळी.सार.भजे.केशरदुध देण्यात आला

यावेळेस तुपे महाराज पुरुषोत्तम महाराज भागिनाथ मगर. राजेंद्र मगर.दादाभाऊ मगर भाऊसाहेब मगर हरिभाऊ मगर.मनोहर मगर रामदास मगर  दादाभाऊ बोडखे किशोर मगर रवि मगर वसंत मगर.यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top