जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे
सुरु असलेली सक्तीची कर्जवसुली
नरहरी झिरवाळ थांबवावी मागणीसाठी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह शिष्टमंडळाने सहकार उपसचिव संतोष पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, धोंडीराम थैल उपस्थित होते. यावेळी श्री. झिरवाळ यांनी श्री. पाटील यांच्याशी चर्चा करत सक्तची कर्जवसुली
जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा
शेतकरी संघटना समन्वय समिती व विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि इतर शेतकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर २७२ दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलन, उपोषणाची शासनाने अद्याप दखल न घेतल्याने आंदोलनस्थळावर राज्यातील इतर शेतकरी संघटना सहभाग घेऊन राष्ट्रीय किसान कर्जमुक्ती परिषदेमार्फत मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढणार आहेत.
स्वामी शांतीगिरी महाराज यांचे अध्यक्षतेखाली व रामकृष्णदास महाराज यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार
स्वामी शांतीगिरी महाराज यांचे अध्यक्षतेखाली व रामकृष्णदास महाराज यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती भगवान बोराडे, शेतकरी संघटना समन्वय समिती कैलास बोरसे, दिलीप पाटील, धोंडीराम चैन, जयराम बहिरम यांनी दिली.
थांबविण्याबाबत सुचित केले. त्यानंतर श्री. पाटील यांनी नागपूरला झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बँकेबाबत कार्यवाही करण्यात येईल. नाशिक येथे झालेल्या बैठकीच्या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही होईल, असे शिष्टमंडळास सांगितले.