स्वयंचलित पर्जन्यमान यंञ स्थालांतरित करण्यासाठी जागा द्या! शेतकरी कृती समितीची मागणी

0

  


दि १ फेब्रुवारी २०२४ रोजी डोणगाव मंडळातील स्वयंचलित पर्जन्यमान यंञा बाबत गेल्या अनेक वर्षांपासून संशय करत आहेत त्यामुळे वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी,पिकविमा अनुदान मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण  होत होत्या त्यामुळे स्वयंचलित पर्जन्यमान यंञाची तपासणी करण्याची मागणी शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी गंगापूर यांच्या कडे मोबाईल टावर वर शोले आंदोलन करण्यात आली होती.


स्वयंचलित पर्जन्यमान आहे की दारू मुतारीचा अड्डा 

 ता ४ जानेवारी २०२४ रोजी स्काय मॅट कंपनी पुणे प्रतिनिधी, कृषी अधिकारी व डोणगाव मंडळातील शेतकर्यांच्या उपस्थित तपासणी पंचनामा करण्यात आला. यावेळी स्वयंचलित पर्जन्यमान आहे की दारू मुतारीचा अड्डा आहे अशी शंका उपस्थित करून डोणगाव मंडळातील स्वयंचलित पर्जन्यमान यंञ स्थालांतरित करण्यात यावे अशी मागणी केली होती. 



त्याअनुषंगाने कृषी विभाग गंगापूर यांच्या विनंतीवरून शेतकरी कृती समितीच्या वतीने इंजी महेशभाई गुजर, संजय सुलाने सरपंच डोणगाव ग्रामपंचायत, शेतकरी किशोर नवले, तुलसीदास पवार यांनी डोणगाव ग्रामपंचायत कडे सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच यांनी ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत पंचायत इमारतीवर सुरक्षित जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे ना हरकत पञ कृषी अधिकारी ता गंगापूर यांना देण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top