समृद्धिच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची ऊरलीत फक्त सांगाडेच !
विकास मोठा होतोय, तर प्रगतिच्या बाबतीत विचारूच नका! कारण जिथे कधीकाळी आठ फुटांच्या जागेतून रस्ता काढत मुंबई गाठावी लागायची, तर आता याच मुंबई मायानगरीकडे नागपूर पासून जलदगती मार्गाने जाता येतय. तो मार्ग म्हणजे समृद्धि! हाच समृद्धि महामार्ग तयार करताना कोट्यवधी झाडे तोडण्यात आली,पर्यावरणाचा समतोल बिघडवीला गेला,तरी सूद्धा लाज-काज का होईना झाडे लागवडीचा देखावा माञ जय्यत तयारीत करण्यात आला.
कोट्यवधी तोडली अनं हजारो लावली..जगलेली माञ बोटावरच !
समृद्धि महामार्ग बणविताना कोट्यवधी झाडे यंञांच्या सहाय्याने खचा-खच तोडली गेली.माञ महामार्ग तयार होऊ द्या आम्ही पुन्हा कोट्यवधी झाडे लावूच असा देखावा आणि आश्वासनांचा पाऊस सरकारकडून पाडण्यात आला.माञ हा देखावा आणि पाऊस मृगजळच ठरलेय !
पाण्याशिवाय ऊभे असलेले झाडांचे सांगाडे घेताहेत शेवटचा श्वास !
महामार्गाच्या दोन्ही बाजूस संपादित केलेल्या जागेवर संबंधित विभागाकडून वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली खरी माञ ही सर्व लावलेली रोपटे झाड बनु पहात असतानाच त्यांचे फक्त सांगाडे शिल्लक राहीलेले आहेत. अशा स्थितीत त्या झाडांना पाणी कोण देणार असा प्रश्न निर्माण होतोय !
हिवाळ्यातच झाडे मोजताहेत अंतिम घटिका, ऊन्हाळ्यात सांगाडेही दिसणार नाहीत
सध्या हिवाळा संपत चाललाय खरा पण इतकी कडाक्याची थंडीची हुडहूडी असतानाही आत्ताच लावलेल्या झाडांचा कचरा होतोय.अजून तर मार्चपासून ऊन्हाळ्याची दाहकता या चिमुकल्या रोपट्यांना सहन करायचीय माञ हीच स्थिती राहीली तर रखरखत्या ऊन्हात या झाडांचे अस्तित्व धोक्यात हे माञ नाकारता येणार नाही.
पाणी हेच जिवन ,पण देणार कोण ?
एकिकडे जलजिवन मिशन सारखे अनेक अभिनव ऊपक्रम राबविले जात आहेत तर दुसरीकडे सपशेल या झाडांकडे दुर्लक्ष केले जात आहेत. किमान टँकरद्वारे जर पुढिल चार महिने या झाडांना पाणी पुरविल्या गेले तर निश्चितच झाडांना जिवनदान मिळून निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकतो
हे माञ तितकच सत्य !