bjpआमदार Ganpat Gaikwad यांनी शिंदे गटाच्या Mahesh Gaikwad यांच्यावर गोळ्या का झाडल्या

0

अचानक आमदार गणपत गायकवाड हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्या दिशेने आपल्या बंदुकीतून ४ गोळ्या झाडल्या यावेळी जीव वाचविण्यासाठी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांनी दालनातून बाहेर पळ  काढायला सुरुवात केली .गणपत गायकवाड यांनी दोन गोळ्या राहुल पाटील च्या दिशेनेही झाडल्या . 

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यात विशेष बाब म्हणजे हा सगळा प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडला आहे.


आमदार गणपत  गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात कुठला वाद होता?

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात जमिनीचा वाद सुरु होता. या वादातून ते दोघेही आपल्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहचले.याचवेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली.बघता बघता हि शाब्दिक चकमक वादात कधी परिवर्तीत झाली काहीच लक्षात येण्या अगोदर अचानक आमदार गणपत गायकवाड यांनी बंदूक काढली आणि महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या.महेश गायकवाड यात गंभीर जखमी झाले असून ते आता मृत्यूशी झुंज देत आहेत.


पोलीस म्हणतात?

महेश गायकवाड व गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला याब्ब्दाल्ची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले होते.त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी सुरु झाली आणि यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला.यात दोन जन जखमी झाले आहेत.



 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top