नाण्यांचे प्रशांत भाऊसाहेब ठोंबरे यांचे प्रदर्शन
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जे आर्थिक व्यवहाराचे चलन होते त्या चलनी नाण्यांचे प्रदर्शन येथील प्रशांत भाऊसाहेब ठोंबरे यांनी शिवजयंती निमित्त सोमवार(ता,१९)रोजी भरवून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले,त्या काळातील ती फारसी व प्राकृत भाषा, त्याचप्रमाणे त्या काळातील प्रचलित चिन्ह ही नाण्यावर दिसून आलीत .
नाणी पाहण्याची संधी मिळाली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व ईतर संस्थानिकांची जी चलनी नाणी होती ती ही पाहून त्या काळातील हे चलन कसे होते याची प्रचीती वैजापूरकराना आली. नाणी पाहण्याची संधी मिळाली या प्रदर्शनाला शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी भेट देऊन हे अनोखे
प्रदर्शनं भरविल्या बद्धल प्रशांत ठोंबरे यांचे त्यांनी अभिनंदन केले
प्रदर्शनं भरविल्या बद्धल प्रशांत ठोंबरे यांचे त्यांनी अभिनंदन केले,या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे बाबासाहेब जगताप,अनिल नाईकवाडी यांची ही उपस्थिती होती,(फोटो कॅप्शन-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चलनी नाणी प्रदर्शन पाहतांना मनीष दिवेकर,धोंडीराम राजपूत,व शिक्षक भारती परिवार)