संपुर्ण महाराष्ट्र आपल्या कडे एक संवेदनशील नेता म्हणून पाहतो ! मराठा आरक्षण संदर्भात श्री मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून आपण प्रयत्न केले तेव्हा आपल्या तर माणुस महाराष्ट्राने पाहिला !आपण भर सभेत स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली तेव्हा आपल्या तला जातिवंत मराठा महाराष्ट्राने पाहिला.. !!
मराठा समाज श्री मनोज जरांगे-पाटील आपल्या लवाजम्यासह मुंबई मोहिमेवर आले
मराठा समाज श्री मनोज जरांगे-पाटील आपल्या लवाजम्यासह मुंबई मोहिमेवर आले तेव्हा आवश्यक तो शासननिर्णय काढत असताना आपल्यातला तत्पर मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला पण...१६ तारखेला सगेसोयरे चा अध्यादेश शासननिर्णयामध्ये परिवर्तीत करण्याचा आपण शब्द दिला त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडताना दिसत नाहीत, मराठा तरुणांनावरील खोटे गुन्हे मागे घेण्याचे जे आश्वासन दिले त्यावर कृती होताना दिसत नाही वरुन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ती टांगती तलवार समोर आहे !
मनोजदादा जरांगे-पाटील हे संपुर्ण मराठा समाजाचे दैवत आहेत
अशा विचित्र परिस्थिती मध्ये मराठा आरक्षण चा यज्ञ वाया जाऊ नये म्हणून परत श्री मनोजदादा जरांगे-पाटील हे उपोषणाला बसलेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे ! तुम्ही आणि तुमचे सरकार मनोजदादा ला विश्वास द्यायला कमी पडत आहात !श्री मनोज जरांगे-पाटील यांनी नेहमी तुमच्या वर १००% विश्वास दाखवला आहे तो टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे ! श्री मनोजदादा जरांगे-पाटील हे संपुर्ण मराठा समाजाचे दैवत आहेत आणि सकल मराठा समाज आपल्या कडे मोठ्या आशेने पाहतोय !
जरांगे-पाटील यांचा जीव वाचवून आपण ती कमतरता थोड्याफार प्रमाणात भरुन काढू शकता
आपण आनंद दिघे साहेबांना गुरु मानता आणि त्यांना वाचवु शकला नव्हता पण निदान श्री मनोजदादा जरांगे-पाटील यांचा जीव वाचवून आपण ती कमतरता थोड्याफार प्रमाणात भरुन काढू शकता !एकनाथ शिंदे साहेब, आपण दिघे साहेबांना वाचवु शकला नाही निदान श्री मनोज जरांगे पाटलांना तरी वाचवा, त्यांचे उपोषण सुटावे म्हणुन लवकर शासननिर्णय पारित करा.. !!